परभणी  जिल्ह्यात १ लाख मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:04 AM2019-01-23T00:04:26+5:302019-01-23T00:05:06+5:30

भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यात राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी यादीत झाली आहे़ मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीसाठी १ लाख ७ हजार ५ मतदारांची भर पडली असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्ष आणि पदाधिकाºयांच्या कामातही यानिमित्ताने वाढ झाली आहे़

Parbhani district has more than one lakh voters | परभणी  जिल्ह्यात १ लाख मतदार वाढले

परभणी  जिल्ह्यात १ लाख मतदार वाढले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यात राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी यादीत झाली आहे़ मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीसाठी १ लाख ७ हजार ५ मतदारांची भर पडली असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्ष आणि पदाधिकाºयांच्या कामातही यानिमित्ताने वाढ झाली आहे़
एप्रिल २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीच्या कालावधीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले कसब पणाला लावून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी १२ लाख ६९ हजार १४६ मतदारांमधून जिल्ह्याचा उमेदवार निवडण्यात आला़ आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे़ साधारणत: मार्च महिन्यात या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होणार असून, त्यापूर्वीच भारत निवडणूक आयोगाने कामाला सुरुवात केली आहे़ निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदार पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला़ १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर २०१८ या काळात नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली़ १ जानेवारी २०१८ हा अर्हता दिनांक निश्चित करून १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली़ महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीचे कार्यक्रम पार पडले़ तसेच दुबार नावे, नावातील दुरुस्त्याही करण्यात आल्या़ ३१ जानेवारी रोजी या उपक्रमाची अंतीम मतदार यादी जाहीर होणार असून, या मतदार यादीवरच आगामी लोकसभेचे मतदान घेतले जाणार आहे़
सरासरी २५ हजार मतदार वाढले
परभणी लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघ आणि जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे़ जिल्ह्याचा विचार करता प्रत्येक विधानसभा मतदार संघात सरासरी २५ हजार मतदारांची वाढ झाली आहे़ जिंतूर मतदार संघात मागील वर्षीच्या लोकसभेसाठी ३ लाख १६ हजार ९३५ मतदार होते़ यावर्षी ३ लाख ४५ हजार ३४२ मतदार संख्या झाली आहे़ या मतदार संघामध्ये २८ हजार ४०७ नवीन मतदारांची भर पडली आहे़ परभणी विधानसभा मतदार संघात २७ हजार १११ नवीन मतदारांची भर पडली असून, या मतदार संघाची मतदार संख्या २ लाख ९९ हजार २५३ एवढी झाली आहे़ गंगाखेड मतदार संघात २८ हजार ७४ नवीन मतदारांची नोंद झाली असून, पाथरी विधानसभा मतदार संघामध्ये २३ हजार ४१३ मतदार वाढले आहेत.
८ टक्के महिला मतदार कमी
परभणी जिल्ह्याच्या लोकसंख्येतही पुरुष आणि महिलांचे प्रमाण असमतोल आहे़ जिल्ह्यामध्ये १० लाख २९ हजार ३४७ पुरुष असून, ९ लाख ७५ हजार २२६ महिला आहेत़ मतदार यादीतही पुरुष आणि महिलांचे प्रमाण असमतोल असल्याचे दिसत आहे़ जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये ७ लाख १५ हजार २४९ पुरुष मतदार असून, ६ लाख ६० हजार ८९१ महिला मतदारांची संख्या आहे़ पुरुषांच्या तुलनेत ८ टक्के महिला मतदार कमी आहेत़
तृतीयपंथी मतदारांतही वाढ
येथील निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये नव मतदार, महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली़ त्याचबरोबर जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये तृतीयपंथी मतदारांचीही वाढ झाली आहे, हे विशेष़ १ जानेवारी २०१८ रोजी मतदार यादीत ७ तृतीयपंथी मतदारांची नोंद होती़ पुनरिक्षण कार्यक्रमानंतर तृतीयपंथी मतदारांची संख्या ११ झाली असून, ४ मतदारांची वाढ झाली आहे़
२१ जानेवारीपर्यंत जिल्हा निवडणूक विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या १३ लाख ७६ हजार १५१ एवढी झाली आहे़ मागील निवडणुकीमध्ये १२ लाख ६९ हजार १४६ मतदार होते़ मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी १ लाख ७ हजार ५ मतदारांची भर पडली आहे़ त्यामुळे निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठीही स्पर्धा वाढली आहे़ या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, ३१ जानेवारी रोजीच अंतीम मतदारांची संख्या निश्चित होणार आहे़

Web Title: Parbhani district has more than one lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.