परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:21 AM2018-10-30T00:21:05+5:302018-10-30T00:21:49+5:30

दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़

Parbhani district: inspection of seven thousand water sources | परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी

परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़
या तपासणीच्या अनुषंगाने सोमवारी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या सूचनेनुसार येथील जिल्हा परिषदेत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, तालुकास्तरावरील गट व समूह समन्वयकांची कार्यशाळा पार पडली़ या कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करडखेलकर यांनी उपस्थितांना जिल्ह्यातील जलस्त्रोतांची माहिती देऊन पाण्याची रासायनिक तपासणी कशा पद्धतीने करावी, या विषयी मार्गदर्शन केले़ तसेच आॅनलाईन अ‍ॅप्लीकेशन संदर्भातही माहिती दिली़ जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची तपासणी या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे़ जलस्त्रोतांच्या माध्यमातूनच साथ रोगांचा फैलाव होतो़
ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यातील १५० जलस्त्रोतांची तपासणीही पूर्ण झाली़ या कार्यशाळेमध्ये जलस्त्रोतांच्या रासायनिकत तपासणीबाबतचे तांत्रिक मुद्देही उपस्थितांना सांगण्यात आले़
यावेळी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़

Web Title: Parbhani district: inspection of seven thousand water sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.