परभणी : जिंतूर तालुक्यात दोन राष्ट्रीय महामार्गांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:21 AM2018-03-11T00:21:24+5:302018-03-11T00:22:03+5:30

तालुक्यात जिंतूर- परभणी हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर काही महिन्यातच जिंतूर-सेनगाव व गणेशपूर-मेहकर या महामार्गाची घोषणा झाली आहे. या दोन्ही रस्त्याचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

Parbhani: In the district of Jeetur, two national highways are covered | परभणी : जिंतूर तालुक्यात दोन राष्ट्रीय महामार्गांची भर

परभणी : जिंतूर तालुक्यात दोन राष्ट्रीय महामार्गांची भर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर: तालुक्यात जिंतूर- परभणी हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर काही महिन्यातच जिंतूर-सेनगाव व गणेशपूर-मेहकर या महामार्गाची घोषणा झाली आहे. या दोन्ही रस्त्याचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.
या संदर्भात केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाने ६ मार्च रोजी जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये गणेशपूर- कोठा-वझर हंडी- लोणी- रिसोड-मेहकर व जिंतूर-येलदरी-सेनगाव या दोन मार्गाचा समावेश आहे. या दोन्ही मार्गाचे प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत तत्काळ निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये गणेशपूर- मेहकर १२० कि.मी., जिंतूर- सेनगाव ३५ कि.मी. चा समावेश आहे. हा मार्ग दोन पदरी, चार पदरी होणार असून यासाठी किती जमीन संपादित करावी लागणार आहे, किती पूल बांधावे लागणार आहेत, नेमका मार्ग कोठून जवळ पडेल आदी संदर्भात माहिती या अहवालात देण्यात येणार आहे. या सर्व कामांकरीता ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या रस्त्याचे टेंडर पास होणार आहे.
साधारणत: चार ते पाच वर्षामध्ये या कामास सुरुवात होऊ शकते. या दोन राष्ट्रीय महामार्गामुळे जवळपास ६ तालुके व १०० पेक्षा जास्त गावांना फायदा होणार आहे. दरम्यान, गणेशपूर-लोणार-मेहकर या १२० कि़मी़ रस्त्यासाठी अंदाजे १५०० कोटी रूपयाचा निधी लागणार असून जिंतूर- सेनगाव या रस्त्यासाठी अंदाजे ५०० कोटी रूपयाचा खर्च अपेक्षित आहे़ या दोन्ही रस्त्यासाठी साधारण २००० कोटी रूपयांचा खर्च लागणार असल्याचे बांधकाम विभागातील सूत्राने सांगितले़
समृद्धी महामार्गास जोडणार
गणेशपूर ते मेहकर हा मार्ग मालेगावजवळून जाणाºया समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. शिवाय मराठवाडा व विदर्भ यांना जोडणारे हे दोन मार्ग असून यामुळे मराठवाडा व विदर्भ यातील २० ते २५ कि.मी.अंतर कमी होणार आहे. जिंतूर शहर हे आता राष्ट्रीय महामार्गाचा केंद्रबिंदू ठरला आहे. औरंगाबाद- हैदराबाद या महामार्गाबरोबरच नव्याने राज्य मार्गावरुन महामार्ग झालेल्या जिंतूर-फाळेगाव, जिंतूर- परभणी यामुळे सर्वच रस्ते राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहेत. त्यामुळे भविष्यात जिंतूर शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे.
जिंतूर तालुक्यात तीन राष्ट्रीय महामार्ग जाणार असल्याने तालुक्याच्या विकासाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच तालुक्याचा इतर जिल्ह्याशी थेट संपर्कही वाढणार आहे. त्यामुळे जिंतूर शहरासह परिसराच्या विकासाला हातभार लागणार आहे. महामार्गाची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुलाचे मुख्य प्रश्न मार्गी लागणार
मराठवाडा- विदर्भाला जोडणाºया येलदरी धरणावरील पूल कमकुवत व कालबाह्य झाला आहे. या पुलाच्या बांधºयासाठी १५ वर्षापूर्वी सर्व्हेक्षण करण्यात आले होते़ मात्र आजपर्यंत याकडे दुर्लक्ष झाले़ आताही या धोकादायक पुलावरून वाहतुक सुरूच आहे़ तसेच वझर येथील पुर्णा नदीवरील पुलाचे सर्व्हेक्षणही २० वर्षापूर्वी झाले होते़ याही पुलाचे अद्यापर्यंत कोणतेही काम झाले नाही़

Web Title: Parbhani: In the district of Jeetur, two national highways are covered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.