परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा : शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणला परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:37 AM2017-12-09T00:37:35+5:302017-12-09T00:38:29+5:30
शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामधील घोषणांनी परिसर दणाणून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामधील घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शिवसेनेच्या परभणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यासंदर्भात शुक्रवारी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याचे नियोजन गेल्या आठ दिवसांपासून सुरु होते. त्यानुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील शनिवार बाजार मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात आ.डॉ.राहुल पाटील, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, परभणी विधानसभा निरीक्षक जगदीश चौधरी, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, संजय गाडगे, माणिक पोंढे, नंदकुमार आवचार, संदीप झाडे, ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, नगरसेवक सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, चंदू शिंदे, अंबिका डहाळे, दीपक देशमुख, विश्वास कºहाळे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, संभानाथ काळे, अजय पेदापल्ली, मारोती तिथे, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड आदी सहभागी झाले होते. मोर्चा शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशनरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले की, शासनाच्या कचखाऊ धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध असताना १२ तासही वीज पुरवठा उपलब्ध करुन दिला जात नाही. थकबाकीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात आहे. रोहित्र जळाल्यानंतर ते लवकर दुरुस्त करुन दिले जात नाही. त्यामुळे पाणी असूनही त्याचा शेतकºयांना उपयोग होत नाही. सरकारच्या या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. कर्जमाफीच्या नावाखाली शासनाने शेतकºयांची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत त्यांनी अच्छे दिन हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आले आहेत. हे केवळ घोषणाबाजी करणारे आॅनलाईन सरकार आहे. या सरकारने शेतकºयांचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाही तर शिवसैनिक त्यांना कधीही आॅफलाईन करु शकतात, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी होती, आहे आणि यापुढेही कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता शेवटपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नावर संघर्ष करीत त्यांच्या सोबत राहणार, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की, नोटाबंदीच्या नावाखाली केंद्र शासनाने सर्व सामान्यांची लूट केली आहे. उद्योगपती व काळा धंदा करणाºयांचा पैसा या माध्यमातून पांढरा करण्यात आला असून सर्वसामान्यांना देशोधडीस लावण्यात आले आहे.
प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन हा केवळ चुनावी जुमला होता. ६० वर्षात काँग्रेसवाल्यांनी जेवढे लुटले नाही, तेवढे तीन वर्षात या भाजपावाल्यांनी लुटले, असे ते म्हणाले. शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यात येईल, असे एकीकडे पंतप्रधान सांगत आहेत. तर दुसरीकडे शेतकºयांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे, मग उत्पन्न कुठून दुप्पट होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी निरीक्षक चौधरी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. नावंदर, जिल्हाप्रमुख आणेराव आदींची भाषणे झाली. या सभेचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चातील बैलगाड्यांनी वेधले लक्ष
शनिवारबाजारपासून निघालेल्या मोर्चात ग्रामीण भागातून बैलगाडीसह आलेले शेतकरी समोरील बाजूस होते. या बैलगाड्यांमध्ये बोंडअळीने नुकसान झालेल्या कापसाची झाडे शेतकºयांनी आाणली होती. रस्त्यावरुन मोर्चा जसा जसा पुढे जात होता, तशा तशा राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकरी करीत होते. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बैलगाडीतील कापसाची पिके भाषणाच्या वेळी व्यासपीठावर ठेवण्यात आली होती. या पिकांकडे पाहून उपस्थित वक्ते बोंडअळीच्या नुकसानीची तीव्रता आपल्या भाषणातून मांडत होते.