परभणी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 10:54 AM2020-06-27T10:54:32+5:302020-06-27T10:55:00+5:30
पाथरी तालुक्यात सर्वाधिक २३ टक्के पाऊस
परभणी : शुक्रवारी रात्री जिल्हाभरात सरासरी ४.६४ मिमी पाऊस झाला असून, आता वार्षिक सरासरीच्या १७.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पाऊस होत आहे. शुक्रवारी रात्री पालम तालुका वगळता जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक १२ मिमी, जिंतूर तालुक्यात ८ मिमी, परभणी ७, गंगाखेड तालुक्यात ६.२५ मिमी, पूर्णा ३, सेलू २.८० आणि मानवत तालुक्यामध्ये १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत १७.८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये पाथरी तालुक्यात सर्वाधिक २३ टक्के, मानवत तालुक्यामध्ये २१ टक्के तर सेलू तालुक्यामध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत १८.१ टक्के पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे सोनपेठ तालुक्यात १७.५ टक्के आणि परभणी तालुक्यात १५.३ टक्के पाऊस झाला आहे.