परभणी जिल्हा क्रीडा संकुलाला तलावाचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:27 AM2019-08-05T00:27:57+5:302019-08-05T00:28:22+5:30
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आली़ या ठिकाणी खेळाडू दररोज सरावासाठी येतात़ परंतु, पावसाळ्यात जिल्हा क्रीडा संकुलात पाणी साचून तळ्याचे स्वरुप येत असल्याने खेळडूंमधून संताप व्यक्त होत आहे़ मागील अनेक वर्षांपासून ही समस्या असल्याने जिल्हा क्रीडा प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेतच दिसून येत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आली़ या ठिकाणी खेळाडू दररोज सरावासाठी येतात़ परंतु, पावसाळ्यात जिल्हा क्रीडा संकुलात पाणी साचून तळ्याचे स्वरुप येत असल्याने खेळडूंमधून संताप व्यक्त होत आहे़ मागील अनेक वर्षांपासून ही समस्या असल्याने जिल्हा क्रीडा प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेतच दिसून येत आहे़
महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली़ या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलावर देखरेख, दुरुस्ती व सोयी सुविधांची जबाबदारी निश्चित करण्यात आली़ राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे आदी या कार्यालयावर जबाबदारी देण्यात आली़ परंतु, परभणी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने केवळ बघ्याचीच भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे राज्य, देश पातळीवर खेळण्यासाठी जिल्ह्यातून जाणाºया खेळाडूंची संख्या बोटावरच मोजण्या इतकी आहे़ त्याचबरोबर शहरासह जिल्ह्यातील कानाकोपºयातून जिल्ह्याच्या या क्रीडा संकुलात सराव करण्यासाठी सकाळी व सायंकाळी या दोन सत्रात खेळाडू येत असतात़ परंतु, जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था पाहून खेळाडूंमध्ये उत्साह संचारण्याऐवजी निराशेला सामोरे जावे लागत आहे़ मागील अनेक वर्षांपासून या जिल्हा मैदानात पावसाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात पाणी साचते़ मैदानात साचणाºया पाण्याचा निचरा करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने अनेक वेळा लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला़ परंतु, अद्यापपर्यंतही जिल्हा क्रीडा संकुलातील पाण्याचा निचरा झाला नाही़ शुक्रवारी शहरात झालेल्या पावसामुळे या जिल्हा क्रीडा संकुलाला तळ्याचे स्वरुप आले होते़ खेळाडुंची गैरसोय झाली़ परंतु, याकडे लक्ष देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास वेळच मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी या क्रीडा संकुलातील सोयी, सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खेळाडूंमधून होत आहे़
विभागीय आयुक्तांच्या आदेशाला दिला खो
४तत्कालीन क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर हे जिल्हा दौºयावर आल्यानंतर त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली होती़ या संकुलात असलेल्या गैरसोय व अस्वच्छतेबाबत तत्कालीन क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांची चांगलीच कानउघडाणी केली होती़ त्यानंतर शहरातील खेळाडूंसाठी महिनाभरात ट्रॅक उभारण्याचे आदेश दिले होते़
४परंतु, आदेश देवून वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी क्रीडा विभागाने आयुक्तांच्या आदेशाला गांभिर्याने घेतले नाही़ अद्यापही रनिंग ट्रॅकचे काम पूर्णत्वास आले नाही़ त्यामुळे एक प्रकारे या क्रीडा विभागाने आयुक्तांच्या आदेशाला खो दिल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे विभागीय आयुक्तांनी खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे़
पत्र्यांचीही झाली दुरवस्था
जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या खेळाचा आनंद घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या गॅलरीचे पत्रे पूर्णत: खराब झाले आहेत़ काही वादळी वाºयात उडून गेले आहेत़
या पत्रांची दुरुस्ती करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून केवळ लाल माती आणे, मैदानावर टाकणे एवढ्यावरच भर दिला जातो़ या व्यतिरिक्त काहीही नवीन होत नाही़
त्याचबरोबर थोडासा पाऊस झाल्यास मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते़ या पाण्याचा निचरा करण्यासाठीही या विभागाकडून ठोस पावले उचलण्यात येत नाहीत़
कोणत्या सुविधा तर उपलब्ध होतच नाहीत़ त्यातच जिल्हा क्रीडा संकुलात अनेक ठिकाणी कचरा आढळून येतो़ त्यामुळे खेळाडूंंना अस्वच्छतेचा नाहक त्रास होतो़
लाखोंचा निधी खर्च; सुविधा मिळेनात
जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व मैदान चांगले ठेवण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी क्रीडा विभागाने वतीने खर्च करण्यात येतो़
परंतु, ना खेळाडुंना सुविधा मिळतात, ना मैदान चांगले होते़ त्यामुळे या सर्व प्रकाराची जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी चौकशी करून खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़