परभणी: ‘चुकीची आणेवारी देऊन अन्याय करु नका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:23 AM2018-10-07T00:23:26+5:302018-10-07T00:23:28+5:30
महसूल प्रशासनाने शासनाला चुकीची पीक आणेवारी सादर करुन शेतकऱ्यांवर अन्याय करु नये तसेच परिस्थितीची पाहणी करुन सुधारित पीक आणेवारी सादर करावी, अशी मागणी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी ५ आॅक्टोबर रोजी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): महसूल प्रशासनाने शासनाला चुकीची पीक आणेवारी सादर करुन शेतकऱ्यांवर अन्याय करु नये तसेच परिस्थितीची पाहणी करुन सुधारित पीक आणेवारी सादर करावी, अशी मागणी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी ५ आॅक्टोबर रोजी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे केली आहे.
गंगाखेड तालुका व परिसरात चालू पावसाळी हंगामात वेळेवर पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली. यामध्ये कुठे उत्पादन घटले तर कुठे शेतकºयांची पिके हातची गेली आहेत. त्यातच तालुका प्रशासनाने दाखविलेली ५७ टक्क्याची आणेवारी शेतकºयांची चेष्टा करणारी आहे. चुकीची आणेवारी देऊन शेतकºयांवर अन्याय करु नये, अशी मागणी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर श्रीकांत भोसले, लिंबाजी देवकते, बबन शिंदे, लक्ष्मण काळे आदींची नावे आहेत.