परभणी : दिल्लीहून आलेले चालक, क्लिनर जिल्हा रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:17 PM2020-04-10T23:17:21+5:302020-04-10T23:17:49+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मूळ रहिवासी असलेला ट्रक ड्रायव्हर क्लिनरसह परभणी शहरात आल्यानंतर त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या फोननंतर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मूळ रहिवासी असलेला ट्रक ड्रायव्हर क्लिनरसह परभणी शहरात आल्यानंतर त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या फोननंतर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली.
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मूळ रहिवासी असलेला एक ट्रक ड्रायव्हर दिल्लीहून क्लिनरसह घरी येणार असल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. त्यानंतर ही माहिती अक्षय देशमुख, विश्वजीत बुधवंत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी या ट्रकवर पाळत ठेवली. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक ट्रक खानापूर फाटा परिसरात आला व तो घरी जात असताना बुधवंत व देशमुख यांनी सदरील ट्रक थांबवून तो वसमत रस्त्यावरील आर.आर.पेट्रोलपंप परिसरात आणला. त्यावेळी ट्रक चालक व क्लिनर पळून जाण्याच्या तयारीत होते. यावेळी या दोघांनाही उपस्थितांनी कोरोनाबाबतचे दूष्परिणाम सांगितले व आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला. यावेळी ट्रक चालकाची विचारपूस केली असता त्याने दिल्लीहून उत्तरप्रदेशमार्गे परभणीत आल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबतची माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना देण्यात आली. त्यांनी परभणी मनपाच्या अधिकाºयांना याबाबत कळविले; परंतु, दोन तास झाले तरी कोणीही तेथे आले नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना फोनवर याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुगळीकर यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर मोंढा पोलीस ठाण्याचे पथक रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या ट्रक चालक व क्लिनरला रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करुन क्वारंटाईन करण्यात आले.