परभणी : कार-जीप अपघातात चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:24 AM2019-04-11T00:24:07+5:302019-04-11T00:24:21+5:30
पाथरी-माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर धडक होवून कार चालक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास घडली आहे़ त्याच प्रमाणे जीपमधील १० जण जखमी झाले असून, गंभीर तिघांवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : पाथरी-माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर धडक होवून कार चालक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास घडली आहे़ त्याच प्रमाणे जीपमधील १० जण जखमी झाले असून, गंभीर तिघांवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
गेवराई येथील १० भाविक एमएच २३ ई/५४४४ या जीपने १० एप्रिल रोजी पाथरी-माजलगाव या रस्त्याने जात होते़ सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान, पाथरी ते ढालेगाव दरम्यान, कार (एमएच २४ व्ही-८७८९) आणि जीपचा समोरासमोर अपघात झाला़
यात कार चालक शिवाजी बन्सी चारे (ता़ केज) हा जागीच ठार झाला असून, जीपमधील अतुल बाळासाहेब जाधव (१७), रत्नमाला प्रकाश ढोरमारे (२०), शुभम रोहिदास पवार (१२), स्वप्नील रोहिदास पवार (८), श्याम रोहिदास पवार (३६), बाबासाहेब जाधव (३६), जिजाबाई राठोड (६१), कमलबाई बालासाहेब जाधव (५०), मालाबाई उत्तम पवार (५८), बप्पासाहेब पांडूरंग खंडागळे (५२) हे १० जण जखमी झाले़ त्यांच्यावर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले़ गंभीर जखमी असलेल्या तिघांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे़