परभणी : वायुसेनेच्या कारवाईचा जिल्हाभरात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:19 AM2019-02-27T00:19:29+5:302019-02-27T00:19:56+5:30
भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट, मुजफराबाद, चिकोटी या अतिरेक्यांच्या स्थळावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या कारवाईबद्दल जिल्ह्यात विविध सामाजिक, राजकीय संघटना व नागरिकांच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट, मुजफराबाद, चिकोटी या अतिरेक्यांच्या स्थळावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या कारवाईबद्दल जिल्ह्यात विविध सामाजिक, राजकीय संघटना व नागरिकांच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२००० विमानांनी मध्यरात्री ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट, मुजफराबाद, चिकोटी या ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या स्थळावर बॉम्ब हल्ले करुन हे स्थळ उद्धवस्त केले. भारतीय वायुदलाच्या या कामगिरीचा परभणी येथे सर्वधर्मियांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. संभाजी सेनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध धर्मिय समाजबांधव एकत्रित जमले. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रामेश्वर शिंदे, एस.एच. हाश्मी, किर्तीकुमार बुरांडे, बालासाहेब मोहिते, सरदार चंदासिंग, बाबासाहेब फले, साहेबराव देशमुख सोन्नेकर, रितेश जैन, जकील मौलाना, सुभाष जोंधळे, प्रदीप भालेराव, रामजी तळेकर, सुधाकर सोळंके, राहुल भालेराव, राहुल ठाकूर, अरुण पवार आदींची उपस्थिती होती.
युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना प्रमुख विशू डहाळे, बाळराजे तळेकर, संदीप पांगरकर, नगरसेवक सुशील कांबळे, चंदू शिंदे, राहुल खटींग, रामदेव ओझा, गणेश मुळे, तुषार चोभारकर आदी उपस्थित होते.
महिला वकिलांनी दिले निवेदन
४जिल्हा न्यायालयातील महिला वकिलांनी वायुदलाच्या अभिनंदनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर अॅड.प्रतिभा बोरीकर, अॅड. माधुरी क्षीरसागर, अॅड.उषा मिसाळ, अॅड.सुषमा वाठोरे, अॅड. उमा बिराजदार, अॅड. सुवर्णा देशमुख, अॅड. अर्चना देशमुख, अॅड. प्रतिभा महाजन, अॅड. संगिता परिहार, अॅड. फरहीन हाश्मी, अॅड. सविता अडकिणे, अॅड. फिरदोस यास्मीन, अॅड. सारिका गिराम, अॅड. विशाखा शेळके, अॅड. प्रियंका दरक, अॅड. सबिहा फारोखी आदींची नावे आहेत.
गंगाखेड येथे जल्लोष
४गंगाखेड येथे भारतीय सेनेच्या या कारवाईबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडण्यात आले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभेदार विश्वनाथ सातपुते, माजी सैनिक हवालदार माणिक बडवणे, हवालदार बाबुराव गव्हाणे, मारोती सूर्यवंशी, नारायण मुंडे, नाईक डिगांबर तांदळे, डॉ.सुभाष कदम, रोहिदास लांडगे, मुरलीधर नागरगोजे, प्रदीप भोसले, शिवाजी कांबळे, गणेश सानप, केशव शेळके, गणेश सातपुते, अंकुश कांबळे, राम घटे, दिलीप साळवे, गुणवंत कांबळे, नरेंद्र भालेराव, शंकर बर्वे आदींची उपस्थिती होती.