परभणी :कार्यालयास लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:15 AM2018-01-01T00:15:09+5:302018-01-01T00:15:53+5:30

शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयास आग लागल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

Parbhani: Due to burning fireworks documents, fire broke out in the office | परभणी :कार्यालयास लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक

परभणी :कार्यालयास लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयास आग लागल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
येथील प्रशासकीय इमारत परिसरात जि.प.चे महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय आहे. याच कार्यालयात सर्व शिक्षा अभियानचेही कामकाज चालते. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास या कार्यालयास अचानक आग लागली. मुख्य गेट जवळील दरवाजच्या बाजूला विविध कागदपत्रे व पुस्तके होती. या पुस्तकांना आग लागली. ही माहिती महिला व बालकल्याणच्या कर्मचाºयांना मिळाल्यानंतर अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशमनदलाची गाडी आल्यानंतर लागलेली आग विझविण्यात आली. वेळीच आग अटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत कागदपत्रे व पुस्तके जळाली. नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी.आर. गिते, जमादार आर.के. मुजमुले यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Parbhani: Due to burning fireworks documents, fire broke out in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.