परभणी : फळबाग लागवडीवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:49 PM2018-11-17T23:49:34+5:302018-11-17T23:50:36+5:30

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले होेते. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने एकाही शेतकºयाने फळबाग लागवड केली नाही. परिणामी ही योजना जिल्ह्यातील शेतकºयांसाठी कुचकामी ठरली आहे.

Parbhani: Due to drought in Horticulture crops | परभणी : फळबाग लागवडीवर दुष्काळाचे सावट

परभणी : फळबाग लागवडीवर दुष्काळाचे सावट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले होेते. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने एकाही शेतकºयाने फळबाग लागवड केली नाही. परिणामी ही योजना जिल्ह्यातील शेतकºयांसाठी कुचकामी ठरली आहे.
राज्यात शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य मिळत होते. मात्र टप्याटप्याने अनुदान देणे बंद केले. त्यानंतर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्डधारक, अल्पभूधारक शेतकरी व अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकºयांना २ हेक्टरपर्यंतच्या फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येते; परंतु, तालुक्यात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. मात्र त्यांच्याकडे जॉबकार्ड नसल्याने मनरेगा योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरीता अनुदान मिळविण्यास अपात्र ठरत होते.
याच पार्श्वभूमीवर जे शेतकरी फळबाग लागवडीपासून वंचित राहत होते, अशा शेतकºयांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर केली. या योजनेला कै. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असे नाव दिले.
कृषी विभागाने शेतकºयांकडून या योजनेसाठी अर्ज मागविले. तालुक्यातील २३३ शेतकºयांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यानंतर या प्रस्तावांची छाननी करून लॉटरी पद्धतीने शेतकºयांची निवड करण्यात आली.
योजनेसाठी पात्र झालेल्या शेतकºयांना निवडपत्रही देण्यात आले. मात्र तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हंगामी पिके घेण्यासाठीच शेतकºयांकडे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत एकाही शेतकºयाने फळबाग लागवड केली नाही.

Web Title: Parbhani: Due to drought in Horticulture crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.