परभणी : सोनपेठ तालुक्यास दुष्काळाच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:06 AM2018-11-14T00:06:06+5:302018-11-14T00:06:32+5:30
तालुक्याला यावर्षी पावसाने हुलकावनी दिली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुकावासियांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): तालुक्याला यावर्षी पावसाने हुलकावनी दिली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुकावासियांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
सोनपेठ तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; परंतु, पावसाच्या खंडानंतर पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले. तर रब्बी हंगामातील पेरण्या ओलव्याअभावी झाल्या नाहीत. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यानंतर तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एका दशकापूर्वी कापसासाठी ओळखल्या जाणाºया सोनपेठच्या बाजारपेठेत आता मंदीची लाट दिसून येत आहे. दरवर्षी ५ ते ६ जिनिंग प्रेसिंगमध्ये दररोज लाखो क्विंटल कापसाची आवक होत होती. त्यामुळे हजारो हातांना काम मिळत होते. मात्र सध्या पावसाअभावी एक ते दोन जिनिंगमध्येच खरेदी सुरु आहे. रब्बी हंगाम हातचा गेल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी व पशूपालकांसमोर जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नोव्हेंबर महिन्यातच उभा टाकला आहे. त्यामुळे पशूपालक चिंतेत दिसून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने तालुक्यात ठिकठिकाणी चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी तालुकावासियांमधून होत आहे.