परभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:28 PM2019-06-19T23:28:05+5:302019-06-19T23:29:45+5:30

मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

Parbhani: Due to the stress of rain, concerns of farmers increased | परभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

परभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
जून महिना आर्ध्यावरती आला असताना मान्सूनचे आगमन झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकºयांनी मे महिन्याच्या तिसºया आठवड्यातच मशागतीची कामे उरकली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ४३ अंशाच्या वर पारा गेला होता. रखरखत्या उन्हात शेतकºयांनी मशागतीची कामे पूर्ण केली; परंतु, जूनचा पहिला पंधरवाडा संपला तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. हवामान कोरडेच असल्याने पेरणीला उशिरा सुरुवात होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निसर्गाने साथ न दिल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जबाजारी शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी उसनवारीने पैसे जमा करीत आहेत. राज्य शासनाने संपूर्ण तालुक्यात अति दुष्काळ असल्याचे जाहीर केले होते.
संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जवळ असलेली सर्व पुंजी खर्च झाली असून खाजगी कर्ज काढून पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत शेतकºयांनी करुन ठेवली आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकुणच शेतीची मशागतीचे कामे आटोपून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.
पारंपरिक बियाणांचा झाला वापर कमी
४पूर्वी शेतकरी घरातील पारंपरिक बियाणांचा वापर करीत होते; परंतु, काळाच्या ओघात काही वषार्पासून पेरणीसाठी संकरित बियाणांचा वापर वाढला आहे. शेतकºयांनी बियाणांची जमवाजमव करुन ठेवली आहे. मानवत तालुक्यात कापूस, सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो. दिवसेंदिवस पावसाचे कमी होणारे प्रमाण हे शेतकºयांसह सर्वासाठीच चिंतेची बाब ठरत आहे.
४तालुक्यात वाढत असलेली पाणी टंचाईची दाहकता आणि पावसाभावी रखडत असलेली पेरणी शेतकºयांसमोर चिंता उभी करीत आहे. यामुळे बियाणे घरात येऊन पडलेली असतानाही जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी करणार कशी? असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.
खताच्या किंमतीमध्ये झाली वाढ
४निसर्गाचे संकट समोर असताना यंदा खताच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
४शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून खताच्या किंमती मागील वर्षी पेक्षा १० ते २५ टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना चांगल्या प्रतिचा खत घेणे अशक्य होणार आहे.
बाजार थंडावला
पाऊस लांबल्याने बियाणे खते, यासह शेतीसाठी लागणारे विविध साहित्य, खरेदीसाठी होणारी गर्दी सध्या तरी दिसत नाही. आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नाही.

Web Title: Parbhani: Due to the stress of rain, concerns of farmers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.