परभणी : अवैध वाळू उपसा करताना गंगाखेड येथे एकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:03 AM2019-02-02T01:03:27+5:302019-02-02T01:03:52+5:30
गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास स्वत: जिल्हाधिकाºयांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी गाढव मात्र फरार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुळी येथील बंधाºयाजवळ घडली. या प्रकरणी गाढव मालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास स्वत: जिल्हाधिकाºयांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी गाढव मात्र फरार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुळी येथील बंधाºयाजवळ घडली. या प्रकरणी गाढव मालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातील वाळू धक्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक वाळू धक्याच्या ठिकाणाहून गाढव, ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिवसा व रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळुचा उपसा सुरूच असल्याचे महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या कार्यवाहीतून दिसून येत आहे. यापूर्वी गंगाखेड शहराजवळील धारखेड येथील गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा केला जात असताना तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, चंद्रकांत साळवे यांच्या पथकाने दोनवेळा केलेल्या कार्यवाहीत एकदा २६ तर दुसºयांदा ७ अशी ३३ गाढवे ताब्यात घेत जप्तीची कार्यवाही केली होती.
अवैधरित्या वाळू उपसा करणारे गाढव महसूल प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी होत होते. ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे परभणीहून पालमकडे जाण्यासाठी गंगाखेडकडे येत असताना मुळी बंधाºयाला भेट दिली.
तेव्हा एक इसम दहा गाढवांच्या माध्यमातून वाळू उपसा करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी वाळू उपसा करणाºया शेख मासूम शेख खलील (रा.सारडा कॉलनी, गंगाखेड) यास पकडून गाडीमध्ये टाकले. त्यानंतर गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर तालुका महसूल प्रशासनाला मुळी बंधाºयाजवळील गोदावरी नदीपात्रातील वाळुचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. तेव्हा अधिकाºयांनी केलेल्या पंचनाम्यानुसार ७४ हजार रुपये किंमतीची २० ब्रॉस वाळू चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून मुळी सज्जाचे तलाठी सतीश मुलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मासून शेख खलील (वय ३५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हरिभाऊ शिंदे, दत्तराव पडोळे, रामकिशन कोंडरे हे करीत आहेत.