परभणी : आठ दिवसांपासूून सोळा गावांत अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:13 AM2019-04-25T00:13:38+5:302019-04-25T00:14:06+5:30
जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणी : जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.
दरवर्षी वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीची लाखो रुपयांची कामे केली जातात; परंतु, ही कामे दर्जेदार होत नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात वीज गूल होण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचे दिसून येते.
जिंंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे, वझर परिसरात १७ एप्रिल रोजी वादळी वाºयासह पाऊस झाला. या वादळी वाºयात वझर येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरील विजेची ५० खांब तर गावठाण लाईनवरील ४५ खांब उन्मळून पडले. त्यामुळे सावंगी भांबळे, वझर, सायखेडा, उमरद, बेलखेडा, कवडा, धमधम, असोला, कोरवाडी, संक्राळा, कोलपा, कुंभेफळ, बनबरडा, कुटे वझर, पिंपरी, बरडा आदी १६ गावात अंधार पसरला आहे. त्याचबरोबर या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह दळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सावंगी भांबळे व वझर परिसरात वादळी वाºयात वीज वितरण कंपनीचे नुकसान होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु, अद्याप एकाही गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून १६ गावांतील ग्रामस्थांंना अंधारात रात्र काढावी लागत आहे.
तसेच पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी. पायपीट करावी लागत आहे. याचे कोणतेही सोयरसूतक महावितरण कंपनीला दिसत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन वादळी वाºयात नुकसान झालेल्या वीज खाबांची तत्काळ दुरुस्ती करावी आणि १६ गावांचा खंडीत झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
४तहसील : कार्यालयाने केले दुर्लक्ष
जिंंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे १७ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाºयात गावातील परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भिंती पडून मोठे नुकसान झाले. तसेच ग्यानोजी मोरे (वय ७०) यांचा मृत्यू झाला. एवढे होऊनही महसूल प्रशासन मात्र सावंगी भांबळे गावाकडे आठ दिवसांचा कालावधी उलटूनही फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सावंगी येथील घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून वीज खांब पडले आहेत. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजेपर्यंत वझर येथील ३३ के.व्ही. पर्यंत वीज लाईनची दुरुस्ती करण्यात आली आहे. सावंगी परिसरातील लाईनच्या दुुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे लवकरच वीजपुरवठा पूर्ववत होईल.
-ज्ञानदेव सावंत,
वरिष्ठ तंत्रज्ञ
ंिजंतूर तालुक्यातील वझर येथील मुख्य लाईनचे काम पूर्ण झाले आहे. आठ दिवसात २४ वीज खांब उभे केले आहेत. ६५ वीज खांब दुरुस्त करण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ७ दिवसांचा कालावधी लागेल.
-विजय मुंडे, कंत्राटदार