परभणी : वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:16 AM2019-05-12T00:16:31+5:302019-05-12T00:17:49+5:30

तालुक्यातील कुंभारी बाजार येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टरवर तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Parbhani: The eight traffic trawlers caught | परभणी : वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले

परभणी : वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील कुंभारी बाजार येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टरवर तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दुधना नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरु होता. या अवैध वाळू उपस्याची कुणकुण तहसील प्रशासनाला लागल्यानंतर ग्रामीण पोलीस व महसूल प्रशासनाने अनेक वेळा रात्री- अपरात्री दुधना नदीपात्र गाठून कारवाई करण्याचा प्रयत्न केला; परंतु, वाळू माफियांचे स्ट्राँग नेटवर्कमुळे अधिकारी, कर्मचारी पोहोचण्याआधीच हे माफिया ट्रॅक्टर घेऊन पसार होत होते. ११ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांसह ट्रॅक्टरमधून परभणी ते कुंभारी प्रवास केला. ट्रॅक्टरमध्ये अधिकारी आल्याने महसूल प्रशासनाची कारवाई खबºयांना लक्षातच आली नाही.
पहाटे ३ वाजेच्या सुमारास गाव परिसरात वाळूची वाहतूक करणाºया तीन ट्रॅक्टरला जागेवरच पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आले. त्यानंतर पहाटे ६ वाजेच्या सुमारास नदीपात्र परिसरात व गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टर व ट्रॉलीचे पंचनामे केले. तहसीलदारांनी वेशभूषा बदलून केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या कामी पोलीस कर्मचारी रमेश गायकवाड, बीटजमादार दीपक भुसारे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Parbhani: The eight traffic trawlers caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.