परभणी: १२ तासांत जाहीर झाला निवडणूक निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:47 AM2019-05-24T00:47:07+5:302019-05-24T00:48:00+5:30
परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल १२ तास चालली़ सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ८ वाजता शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर संपली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल १२ तास चालली़ सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ८ वाजता शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर संपली़
परभणी लोकसभा मतदारसंघातील २ हजार १७४ मतदान केंद्रांवर १८ एप्रिल रोजी मतदान झाले होते़ त्यानंतर २३ मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली़ प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली असली तरी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला नाही़
त्यामुळे उत्सुक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली़ असे असले तरी संपूर्ण दिवसभर प्रशासकीय यंत्रणेने अचूक मतमोजणी करीत निकाल जाहीर केला़ यासाठी ३२८ कर्मचारी व २४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर हे स्वत: मतदान केंद्रावर सकाळपासून ठाण मांडून होते़ पहिल्या फेरीपासून १२ व्या फेरीपर्यंत त्यांनी स्वत:च उमेदवारनिहाय मतांची घोषणा केली़ त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनी पुढील फेºयांची घोषणा केली़
यावेळी पोलिसांच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानाच्या बाजुला उभारण्यात आलेल्या लाकडी कठड्याजवळ वाहतूक व इतर विभागाचे पोलीस कर्मचारी सकाळपासून ठाण मांडून होते़ येथील प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी राहुटी टाकून भर उन्हात खडा पहारा दिला़ त्यांना इतर अधिकाºयांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत होते़
पोलीस कर्मचाºयांच्या या राहुटीसमोरील मैदानात अधिकारी व कर्मचाºयांच्या वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती़ मतदान केंद्र व केंद्रबाहेर ३३ अधिकाºयांसह ४५० पोलीस कर्मचारी उपस्थित होते़ यावेळी त्यांनी खडा पाहरा देऊन उत्साही कार्यकर्त्यांना आवर घातला़ तसेच मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेहनत घेतली़
व्हीव्हीपॅटच्या मतांचीही यशस्वी मोजणी
४परभणी लोकसभा मतदार संघात यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर झाला़ निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रांमधील व्हीव्हीपॅटची मते मोजण्यात आली़ हे काम तसे कीचकट होते़ प्रशासनाने यातही योग्य नियोजन करीत वेळेमध्ये व्हीव्हीपॅट मतांची मोजणी केली़ विशेष म्हणजे मतमोजणीनंतर कुठलाही आक्षेप दाखल झाला नाही़ त्यामुळे प्रथमच केलेली ही मोजणी यशस्वी ठरली़
४सलग १२ तास प्रशासकीय यंत्रणेने मतमोजणीचे कामकाज केले़ रात्री साधारणत: ७़४५ वाजेच्या सुमारास शेवटच्या २९ व्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला़ त्यानंतर अंतीम निकाल असल्याने निवडणूक अधिकारी पी़ शिवशंकर यांनी या निकालाविषयी आक्षेप नोंदविण्यासाठी अथवा काही अडचण असल्यास ती नोंदविण्यासाठी दहा मिनिटांचा कालावधी दिला होता़ त्यानंतर ८ वाजेच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर करण्यात आला़