परभणी : रोजगार सेवकांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:33 PM2019-06-05T23:33:13+5:302019-06-05T23:33:49+5:30

जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मागील एक वर्षापासून मानधन थकले आहे़ त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे़

Parbhani: Employees of the Employment Exchange get tired | परभणी : रोजगार सेवकांचे मानधन थकले

परभणी : रोजगार सेवकांचे मानधन थकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मागील एक वर्षापासून मानधन थकले आहे़ त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे़
परभणी जिलह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मागील एक वर्षापासून थकीत मानधन व प्रवास भत्ता आतापर्यंत मिळालेला नाही़ त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गाव पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना मानधनापासून मात्र वंचित रहावे लागत आहे़ मानधन व प्रवासी भत्ता मिळावा, यासाठी वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना व ग्राम रोजगार सेवकांकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़ परंतु, अद्यापपर्यंत या ग्रामरोजगार सेवकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही़ त्यामुळे वर्षभरापासून थकलेले मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी ग्रामरोजगार सेवक संघटनेने ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ निवेदनावर जिल्हाध्यक्ष रामराव देशमुख, आऱएऩ गाडे, आऱबी़ बोबडे, मारोती पारवे, प्रमोद पारखे, दिलीप शिराळे, शिंदे, बोबडे, ढोणे, सोनवणे, जाधव आदींच्या स्वाक्षºया आहेत़ दरम्यान, ६ जूनपर्यंत थकीत मानधन न दिल्यास ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व ग्रामरोजगार सेवक संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे़

Web Title: Parbhani: Employees of the Employment Exchange get tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.