परभणी : १०१ दिवसांच्या शांतीदूत संस्थेच्या जलयज्ञाची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:12 PM2019-07-04T23:12:29+5:302019-07-04T23:13:25+5:30

येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या १०१ दिवसांपासून मोफत पाणी वाटपासाठी सुरु केलेल्या जलयज्ञाची ३ जुलै रोजी समाप्ती झाली.

Parbhani: The end of the 101-day peace academy | परभणी : १०१ दिवसांच्या शांतीदूत संस्थेच्या जलयज्ञाची समाप्ती

परभणी : १०१ दिवसांच्या शांतीदूत संस्थेच्या जलयज्ञाची समाप्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या १०१ दिवसांपासून मोफत पाणी वाटपासाठी सुरु केलेल्या जलयज्ञाची ३ जुलै रोजी समाप्ती झाली.
शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या २० वर्षांपासून अखंडितपणे प्रवाशांना मोफत पाणी वाटप केले जाते. यावर्षी २३ मार्च पासून मोफत पाणी वाटपास सुरुवात झाली. सकाळी ६ ते रात्री १० वाजेच्या कालावधीत दररोज जवळपास १० हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. ३ जुलै रोजी या जलसेवेचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, आ.डॉ. राहुल पाटील, स्टेशन प्रबंधक देविदास भिसे, प्राचार्य डॉ.बी. यु. जाधव, दिनेश भुतडा उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष सुभाषचंद्र सारडा यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शांतीदूतच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ब्रिजलाल गगरानी, सुभाष काबरा, कांतीलाल झांबड, डी.एम. वर्मा, दुर्गादास बंग, विठूभाई चव्हाण, प्रकाश झाडे, भगवान काकनाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जगदीश जोशी, सत्यनारायण चांडक, भगीरथ सोमाणी आदी उपस्थित होते.

Web Title: Parbhani: The end of the 101-day peace academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.