परभणी : मूलभूत संकल्पनांचा अभ्यास अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:35 AM2019-08-28T00:35:52+5:302019-08-28T00:36:18+5:30
बलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने यापुढे विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील आयसरचे संचालक डॉ़ अरविंद नातू यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने यापुढे विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील आयसरचे संचालक डॉ़ अरविंद नातू यांनी केले़
जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने २७ आॅगस्ट रोजी कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात जिल्ह्यातील मुख्याध्यापक, गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची कार्यशाळा पार पडली़ या प्रसंगी डॉ़ नातू बोलत होते़ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ नितीन मार्कंडेय यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले़ यावेळी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ़ वंदना वाहुळ, सहाय्यक शिक्षण निरीक्षक सतीश निरपणे, अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समितीचे संचालक महेश पाटील, गोविंद मुंडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष देविदास उमाटे, शिवाजीराव पाचकोर, देवानंद अंभोरे, बालासाहेब भांगे, रंगनाथ चव्हाण आदींची उपस्थिती होती़ डॉ़वंदना वाहूळ यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका विशद केली़ शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक सक्षम व्हावेत, यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले़ रंगराव सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले़ शिवाजीराव पाचकोर यांनी आभार मानले़ या कार्यशाळेस जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते़