परभणी :पीकविमा तक्रार निवारणार्थ तालुकास्तरावर समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:18 AM2019-07-14T00:18:04+5:302019-07-14T00:18:29+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़
परभणी जिल्ह्यासह राज्यभरात पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत़ या तक्रारींचे निरसन करण्यासाठी थेट तालुकास्तरावरच समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव तर गटविकास अधिकारी, संबंधित मंडळ कृषी अधिकारी, शेतकºयांचे २ प्रतिनिधी, अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे २ प्रतिनिधी समितीचे सदस्य राहणार आहेत़
कर्जमाफीसाठीही समिती
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत येणाºया शेतकºयांच्या तक्रार निवारणासाठीही तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे़ सहकार अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असून, जिल्हा बँक, अग्रणी बँक व लेखापरीक्षक यांचे प्रत्येकी १ प्रतिनिधी समितीचे सदस्य आहेत़