परभणी :निधी असतानाही शिक्षक वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:25 PM2019-04-13T23:25:25+5:302019-04-13T23:25:57+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचे वेतन १० तारखेपूर्वी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला असतानाही परभणी तालुक्यातील शिक्षकांचे वेतन करण्यात आले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचे वेतन १० तारखेपूर्वी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला असतानाही परभणी तालुक्यातील शिक्षकांचे वेतन करण्यात आले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील शिक्षकांना मार्च महिन्याचे वेतन १० एप्रिलपूर्वी अदा केल्यास बहुजन कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन १० तारखेपूर्वी करावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती. त्यानंतर शिक्षक, कर्मचाºयांचे वेतन अदा करण्यासाठी शिक्षण विभागाने पंचायत समितीनिहाय वेतनासाठीचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यानुसार इतर पंचायत समित्यांनी शिक्षक, कर्मचाºयांचे वेतन अदा केले. परभणी तालुक्यासाठी निधी उपलब्ध असतानाही शिक्षकांचे वेतन अदा झाले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.