परभणी : साडेचार हजार उमेदवारांनी दिली चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:00 AM2020-01-05T01:00:50+5:302020-01-05T01:01:58+5:30

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरतीच्या पहिल्याच दिवशी ४ हजार ६५४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

Parbhani: Examination conducted by four and a half thousand candidates | परभणी : साडेचार हजार उमेदवारांनी दिली चाचणी

परभणी : साडेचार हजार उमेदवारांनी दिली चाचणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरतीच्या पहिल्याच दिवशी ४ हजार ६५४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
परभणीसह ९ जिल्ह्यांसाठी ४ जानेवारीपासून सैन्य भरतीला प्रारंभ झाला आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध मैदानावर ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरतीसाठी हजारो उमेदवार परभणी शहरात दाखल झाले आहेत. शनिवारी पहाटे १ वाजेपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. आॅनलाईन प्रवेशप्राप्त झालेल्या ४ हजार ६५४ उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सैन्य भरतीच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच उमेदवारांशीही संवाद साधला. शारीरिक चाचणीच्या टप्प्यानुसार या ठिकाणी कॅम्प तयार करण्यात आले असून जिल्हाधिाकरी पी. शिव शंकर यांनी प्रत्येक कॅम्पला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. तसेच झेंडी दाखवून जिल्हािधकाऱ्यांच्या हस्ते प्रत्यक्ष चाचणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सैन्यदलातील कर्नल तरुण जामवाल यांच्यासह सैन्यदलातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
भारतीय सैन्य भरतीसाठी उमेदवार मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे परभणीकडे येणाºया रेल्वेगाड्यांना गर्दी वाढली आहे. शनिवारी दिवसभर रेल्वे स्थानकासह बसस्थानकावरही उमेदवारांची गर्दी पहावयास मिळाली. ही भरती प्रक्रिया शक्यतो रात्री सुरु होत असल्याने उमेदवारांनी मिळेल तेथे मुक्काम करुन भरती प्रक्रिया चाचण्यांना हजेरी लावली. १३ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. भरतीस्थळी इतरांना प्रवेश नाकारला आहे.

Web Title: Parbhani: Examination conducted by four and a half thousand candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.