परभणी : गंगाखेडमधून दोघांना केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:08 AM2019-04-02T00:08:57+5:302019-04-02T00:09:19+5:30
गंगाखेड शहरातील लिंबाजी ऊर्फ विजय गोविंद घोबाळे व त्यांच्या टोळीचा सदस्य किरण ऊर्फ बाळू किशनराव घुंबरे या दोघांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गंगाखेड शहरातील लिंबाजी ऊर्फ विजय गोविंद घोबाळे व त्यांच्या टोळीचा सदस्य किरण ऊर्फ बाळू किशनराव घुंबरे या दोघांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
लिंबाजी ऊर्फ विजय गोविंद घोबाळे याच्याविरुद्ध ७ तर त्यांच्या टोळीतील सदस्य किरण ऊर्फ बाळू किशनराव घुंबरे याच्या विरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न करणे, खंडणीसाठी पळविणे, चोरी करणे, जुगार अशा गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांनी त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. सुनावणीअंती पोलीस अधीक्षकांनी टोळीप्रमुख लिंबाजी ऊर्फ विजय गोविंद घोबाळे यास १८ महिन्यांसाठी व किरण घुंबरे यास १२ महिन्यांसाठी गंगाखेड, सोनपेठ, पालम, परभणी, परळी व अहमदपूर तालुक्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, हवालदार भारती, देवकर, वाघ यांनी ३० मार्च रोजी दोघांना नांदेड येथे नेऊन सोडले आहे.
पवारविरुद्ध कारवाई
४परभणी- पूर्णा तालुक्यातील शिवाजी माणिक पवार याच्या हद्दपारीचा प्रस्तावही उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यावरुन शिवाजी पवार यास तीन महिन्यांसाठी परभणी जिल्ह्याच्या क्षेत्रातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.