परभणी : घरकुल बांधकामांवर २९ कोटी रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:49 PM2019-08-25T23:49:01+5:302019-08-25T23:50:03+5:30

रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिका वगळता जिल्ह्यातील नागरी भागात जून महिन्याच्या अखेरपर्यंत २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला असून ८७८ घरकुले बांधून उभी टाकली आहेत.

Parbhani: An expenditure of Rs 90 crore on house construction | परभणी : घरकुल बांधकामांवर २९ कोटी रुपयांचा खर्च

परभणी : घरकुल बांधकामांवर २९ कोटी रुपयांचा खर्च

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिका वगळता जिल्ह्यातील नागरी भागात जून महिन्याच्या अखेरपर्यंत २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला असून ८७८ घरकुले बांधून उभी टाकली आहेत.
मागासवर्गीय प्रवर्गातील गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने नागरी आणि ग्रामीण भागामध्ये रमाई आवास योजना राबविली जाते. २०१० पासून या योजनेचे काम जिल्ह्यात सुरु झाले असून त्या अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज मागविणे, या अर्जांना मंजुरी देणे आणि प्रत्यक्षात घरकुल बांधकाम पूर्ण करुन देणे अशी प्रक्रिया राबविली जाते. घरकुलांसाठी राज्य शासनाकडून अनुदानही दिले जाते. २०१०-११ ते २०१८-१९ या ८ वर्षांमध्ये परभणी जिल्ह्यातील ७ नगरपालिकांना ३ हजार ८२ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८७८ घरकुले बांधून पूर्ण झाली असून ९५० घरकुलांचे बांधकाम सद्यस्थितीला प्रगतीपथावर आहे. या घरकुलांसाठी लाभार्थ्यांना अनुदान म्हणून नगरपालिका प्रशासनाला एकूण ३६ कोटी २८ लाख ४३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा निधी घरकुल बांधकामावर खर्च झाला असून अजून ६ कोटी १७ लाख ४६ हजार रुपये शिल्लक आहेत.
मानवत नगरपालिकेअंतर्गत ४३९ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ११७ घरकुले पूर्ण झाली आहेत. जिंतूर पालिकेत २५० पैकी ७९, पूर्णा पालिकेत ८७७ पैकी ११०, सोनपेठ २४३ पैकी १२२, पाथरी ४२३ पैकी १११, सेलू ३९३ पैकी १३९ आणि गंगाखेड नगरपालिकेमध्ये ४५७ पैकी २०० घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.
नागरी भागामध्ये घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली असतानाही घरकुल बांधकामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जाते; परंतु, प्रत्यक्षात मागील दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यामध्ये वाळूचे भाव गगनाला भिडल आहेत. अनेक भागात वाळू उपलब्ध होत नाही. त्याचाही परिणाम घरकुल बांधकामावर झाला आहे.
आठ वर्षातील उद्दिष्टाच्या तुलनेत २८.४८ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गोरगरीब लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या या योजनेला नगरपालिका प्रशासनाने गती देऊन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी होत आहे.
९५० घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर
४२०१० पासून ते २०१९ पर्यंतच्या रमाई आवास योजनेतील घरकुल बांधकामाची आकडेवारी प्राप्त झाली असून यावर्षीच्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ९५० घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये मानवत नगरपालिकेअंतर्गत १३३, जिंतूर १३०, पूर्णा २८३, सोनपेठ ४८, पाथरी २२४, सेलू ५४ आणि गंगाखेड शहरात ७८ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक
४या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी शिल्लक असून, त्यात मानवत पालिकेकडे १ कोटी ४१ लाख, जिंतूर पालिकेकडे १ कोटी १५ लाख, पूर्णा पालिकेकडे १ लाख ५६ हजार, सोनपेठ पालिकेकडे ११ लाख २९ हजार, पाथरी पालिकेकडे २ कोटी ७२ लाख, सेलू पालिकेकडे ७५ लाख ५८ हजार रुपये शिल्लक आहेत.
पूर्णा शहरात सर्वाधिक निधी खर्च
४आतापर्यतच्या झालेल्या खर्चाच्या तुलनेत पूर्णा शहरामध्ये सर्वाधिक ७ कोटी ५ लाख ९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तर त्या खालोखाल पाथरी शहरात ४ कोटी ३७ लाख १५ हजार रुपये, गंगाखेड शहरात ४ कोटी १६ लाख ५० हजार रुपये.
४सेलू शहरात ३ कोटी ९९ लाख ९२ हजार रुपये, मानवत शहरात ३ कोटी ८२ लाख ३० हजार रुपये, सोनपेठ शहरात ३ कोटी १३ लाख २१ हजार रुपये आणि जिंतूर शहरात २ कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांचा खर्च या योजनेवर झाला आहे.

Web Title: Parbhani: An expenditure of Rs 90 crore on house construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.