परभणी : सोयाबीनने ओलांडली हमीभावाची सीमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:43 AM2018-11-27T00:43:15+5:302018-11-27T00:43:27+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहीर लिलावामध्ये सोयाबीनला सोमवारी ३४२६ रुपयांचा भाव मिळाला. शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा शेतमालाला जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहीर लिलावामध्ये सोयाबीनला सोमवारी ३४२६ रुपयांचा भाव मिळाला. शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा शेतमालाला जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकºयांच्या हाती खरीप व रबी हंगामातील पेरणी केलेली पिके पावसाअभावी येत नसल्याने शेतकरी दरवर्षी आर्थिक कोंडीत सापडत आहे. ज्यावर्षी शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळाले त्यावर्षी व्यापाºयांकडून शेतमाल कवडीमोल दर देऊन खरेदी केला जातो. त्यामुळे उत्पन्न होऊनही शेतकºयांच्या पदरी निराशाच येते, असा जिल्ह्याचा इतिहास आहे.
यावर्षी जून व जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसावर जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाला यावर्षी फाटा देत शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु, २० आॅगस्टनंतर बोरी परिसरात पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन पीक पावसाअभावी जागेवरच करपून गेले.
ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध होते, त्या शेतकºयांनी सोयाबीनचे पीक घेतले; परंतु, शेतकºयांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाºयांकडून खरेदी केला जाऊ लागला. त्यामुळे शेतकºयांना दुष्काळात तेरावा महिना पाहण्याचीच वेळ येऊन ठेपली होती.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात २६ नोव्हेंबर रोजी जाहीर लिलावाद्वारे सोयाबीनची खरेदी करण्यात आली. जाहीर लिलावाच्या वेळी सोयाबीनला केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या ३३९९ रुपयांच्या हमीभावापेक्षा अधिक ३४२६ रुपये प्रती क्विंटल भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
३०० क्विटंल: सोयाबीनची खरेदी
४जिंंतूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बोरी बाजार समितीकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून शेतकºयांच्या शेतमालाला इतर बाजारपेठेपेक्षा जास्तीचा भाव मिळत असल्याने बोरी व परिसरातील शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीमधील मार्केटमध्ये विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत.
४२६ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या जाहीर लिलावामध्ये सोयाबीनला प्रती क्विंटल ३४२६ रुपयांचा हमीभाव मिळाला आहे. या एकाच दिवशी बाजारपेठेत ३०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक चंद्रकांत चौधरी यांनी लोकमतशी बोलताना दिली.