परभणी बाह्य वळण रस्ता; नव्या निर्णयानुसार भूसंपादन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:19 AM2018-09-13T00:19:59+5:302018-09-13T00:20:58+5:30
राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार भूसंपादन करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार भूसंपादन करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे.
महाराष्टÑ शासनाने १३ आॅगस्ट २०१८ रोजी परिपत्रक काढून सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करावयाच्या जमिनीचा मोबदला रेडी रेकनर दरानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाºया जमिनीसाठी मोबदला हा हायवे वरील जमिनीसाठी लागू असलेल्या रेडी रेकनरनुसार टप्पा पद्धत न अनुसरता द्यावयाचा आहे. जास्तीत जास्त शेतकºयांना मोबदला देता यावा, या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये राष्टÑीय महामार्गालगत जमीन संपादन होत असताना शासन परिपत्रक १३ आॅगस्ट २०१८ नुसार शेतकºयांना मोबदला दिला जात आहे. त्याचप्रमाणे परभणी शहर बाह्य वळण रस्त्यासाठी देखील शासन परिपत्रक १३ आॅगस्ट २०१८ नुसार मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आनंद भरोसे यांनी केली आहे. जिल्हाधिकाºयांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी सावंगीचे सरपंच गुलाब पंढरकर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजीत गरुड, तालुकाध्यक्ष कैलास ढगे, दत्ता दौंड, प्रवीण गायकवाड, दत्ता आसोलेकर, दासराव रणेर, विशाल बोबडे आदींची उपस्थिती होती.