परभणी : सीसीआयच्या विरोधात शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:14 AM2019-11-27T00:14:33+5:302019-11-27T00:14:55+5:30
मानवत येथे सीसीआयच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रांगेत असलेल्या कापसाच्या दहा गाड्या चक्क परभणी येथे आणून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मानवत येथे सीसीआयच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रांगेत असलेल्या कापसाच्या दहा गाड्या चक्क परभणी येथे आणून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़
मानवत येथे सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केली जात आहे़ सीसीआय सर्व कापसाची खरेदी करीत नसल्याने यापूर्वीही शेतकरी संतप्त झाले होते़ या शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते़ त्यानंतर तोडगा काढण्यात आला; परंतु, मंगळवारीही हिच समस्या शेतकºयांसमोर दिसून येत होती़ मंगळवारी सकाळी मानवत बाजार समिती परिसरात सीसीआयकडे कापसाची विक्री करण्यासाठी सुमारे २५० वाहने उभी होती़ मात्र सीसीआयने केवळ ५ ते १० वाहनांतील कापूस खरेदी केला़ इतर वाहनांमधील कापूस नाकारण्यात आला.
त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संतप्त झाले़ सीसीआयच्या विरोधात थेट जिल्हाधिकाºयांकडेच तक्रार करण्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला़ त्यानंतर मानवत येथून कापसाची दहा वाहने परभणीकडे निघाली़
प्रत्यक्ष जिल्हाधिकाºयांनाच कापूस दाखवून तो का खरेदी केला जात नाही, असा जाब विचारला जाणार होता़ ही बाब लक्षात आल्यानंतर मानवतहून येणारी वाहने विसावा कॉर्नर येथेच पोलिसांनी रोखून धरली़ केवळ दोन वाहने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचली़ शेतकºयांनी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना मांडल्या़ सीसीआयकडून कापूस खरेदी केली जात नाही़ यावेळी शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला कापूसही जिल्हाधिकाºयांना दाखविला व सर्व शेतकºयांच्या कापसाची खरेदी करावी, अशी मागणी केली़
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, हनुमान मसलकर, मुंजाभाऊ रोडे, भास्कर खटींग, मारोती आवचार, बाबासाहेब आवचार, उद्धव बांगर, बाळू ढगे आदींची उपस्थिती होती़