परभणी : शेतकरी जनजागृतीला कृषी विभागाचा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:34 AM2019-08-28T00:34:00+5:302019-08-28T00:34:18+5:30

राज्य शासनाचे आदेश असतानाही जिल्ह्यात फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रभावी जनजागृती होत नसल्याने शेतकऱ्यांंमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ केवळ खाजगी कंपनी नेमून कृषी विभागाने हात वर केल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़

Parbhani: Farmers' awareness is' lost 'in agriculture | परभणी : शेतकरी जनजागृतीला कृषी विभागाचा ‘खो’

परभणी : शेतकरी जनजागृतीला कृषी विभागाचा ‘खो’

Next

मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाचे आदेश असतानाही जिल्ह्यात फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रभावी जनजागृती होत नसल्याने शेतकऱ्यांंमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ केवळ खाजगी कंपनी नेमून कृषी विभागाने हात वर केल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़
दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना शेतकºयांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरू झाले होते़ फवारणीची तंत्रशुद्ध मााहिती नसल्याने शेतकºयांना या संकटाला सामोरे जावे लागले़ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढून कृषी विभागातील अधिकाºयांनी गावा-गावांत जाऊन फवारणी कशी करावी आणि फवारणी करताना काय काळजी घ्यावी, या बाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले होते़ मात्र दोन वर्षांपासून कृषी विभागाने या संदर्भात गांभिर्याने घेतले नाही़ जनजागृतीकडे पाठ फिरविली़ दोन दिवसांपूर्वी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे एका शेतकºयाचा फवारणी करताना विषबाधा होवून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़
त्यामुळे आता कृषी विभागाच्या जनजागृतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ या संदर्भात कृषी विभागातील अधिकाºयांनी मागील १५ दिवसांपासून प्रत्यक्षात जनजागृतीला सुरुवात केली असली तरी हे अधिकारी किती गावांपर्यंत पोहोचले, हाही प्रश्न आहे़ विशेष म्हणजे, ज्या गावात फवारणी करताना शेतकºयाचा मृत्यू झाला़ त्या गावात जनजागृती संदर्भात विचारणा केली असता, कृषी विभागातील अधिकारी आले नसल्याची माहिती मिळाली आहे़ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ पावसाने ताण दिला असून, ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने पिके प्रादुर्भावग्रस्त होत आहेत़ या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहेत़ जसा प्रादुर्भाव वाढला तसे फवारणीचे प्रमाणही वाढले आहे़ विशेष म्हणजे, फवारणीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता कुठे कृषी विभागाने जनजागृतीला सुरुवात केली आहे़ केवळ कागदोपत्री मेळावे घेऊन चार-दोन गावांत जनजागृती केली जात आहे़ जिल्ह्यामध्ये ८४८ गावे असून, या पैकी किती गावांमध्ये कृषी विभाग पोहोचला, हा संशोधनाचा विषय आहे़ दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने जनजागृती संदर्भात अध्यादेश दिले असले तरी प्रत्यक्षात जनजागृती होत नाही़ क्रॉपसॅप या कार्यक्रमांतर्गत कृषी विभागातील अधिकारी शेतकºयांना माहिती देतात? असे सांगितले जाते; परंतु, फवारणी सुरू होण्यापूर्वीच शेतकºयांची जनजागृती करणे आवश्यक होते़ या जनजागृतीला खो दिल्यामुळे अजूनही शेतकरी पारंपारिक पद्धतीने फवारणी करतात आणि त्याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागतो़ दोन दिवसांपूर्वी कौसडी येथे तर एका शेतकºयाला आपला जीव गमवावा लागला़ त्यामुळे कृषी विभागाच्या जनजागृती मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
खाजगी कंपनीमार्फत जनजागृती
४जिल्ह्यातील शेतकºयांना फवारणीची माहिती देण्यासाठी गोदरेज अ‍ॅग्रीवेट कंपनी या खाजगी कंपनीची निवड करण्यात आली आहे़ या कंपनीच्या माध्यमातून फवारणी संदर्भातील माहिती शेतकºयांना दिली जात आहे़ ही कंपनी जनजागृतीसाठी नियुक्त केली असली तरी कंपनीकडे जनजागृतीसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही़ एकच चित्ररथ तयार करण्यात आला असून, तो संपूर्ण जिल्हाभरात फिरविला जात आहे़
४त्यामुळे हा चित्ररथ किती गावांपर्यंत पोहचेल असा प्रश्न निर्माण होत आहे़ शिवाय चार-पाच कर्मचाºयांच्या सहाय्याने संपर्ण शेतकºयांपर्यंत फवारणीची शास्त्रोक्त माहिती पोहचेल का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे़ एकंदर खाजगी कंपनी आणि कृषी विभागातील अधिकारी यांच्याकडून फवारणीसाठी गांभिर्याने प्रयत्न होत नसल्याने शेतकºयांपुढे असुरक्षितता निर्माण झाली आहे़
घटनेनंतर दाखल झाले अधिकारी
४जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील एका शेतकºयाचा कीटकनाशक फवारताना ते अंगावर उडाल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाला़
४ही घटना घडल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांना जाग आली. घटनेनंतर जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाºयांनी कौसडी येथे भेट देऊन माहिती घेतली.
४कृषी विभागातील अधिकाºयांनी यापूर्वीच कौसडी येथे जनजागृती केली असती तर कदाचित शेतकºयाला जिव गमवावा लागला नसता.
परवानगी नसलेली औषधी बाजारात विक्रीला
खरीप हंगामातील पिकांना कीड व रोगापासून मुक्त करण्यासाठी शेतकºयांकडून कीटकनाशकांची फवारणी केली जाते़ त्यासाठी हे औषध कसे हताळायचे यावर कृषी विभागाकडून शेतकºयांची जनजागृती करण्यात येते; परंतु, तसे होताना मात्र दिसून येत नाही़
विशेष म्हणजे ज्या औषधांना विक्री करण्यासाठी परवानगी नाही, ती औषधी सुद्धा बाजारातून सर्रासपणे विक्री केली जात आहेत़ कृषी विभाग मात्र बघ्याची भूमिका घेऊन एकप्रकारे ही औषधी विक्री करण्यास सहमती देतो की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़
त्या कारखान्यावरील कारवाई गुलदस्त्यात
दोन वर्षापूर्वी परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात पोलीस प्रशासन व कृषी विभागाने बनावट खत व औषधींचा कारखाना उघडकीस आणला होता़ त्यावर मोठी कारवाई होईल, अशी अपेक्षा शेतकºयांची होती़ परंतु, दोन वर्षे उलटले तरीही या कारवाईत काय झाले? याबाबत अद्यापही स्पष्टता दिसून येत नाही़
गोदरेज अ‍ॅग्रीवेट कंपनीने परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, गंगाखेड आणि मानवत येथे कर्मचारी नियुक्त केले आहेत़ हे कर्मचारी गावा-गावांत जाऊन शेतकºयांना फवारणीची माहिती देतात़ जुलै महिन्यापासून जनजागृतीला सुरुवात केली असून, आतापर्यंत ६० ते ७० गावांत जनजागृती झाली आहे़ २१ आॅगस्टपासून फवारणीची माहिती देणारा चित्ररथ फिरविला जात आहे़ जिंतूर, परभणी, गंगाखेड तालुक्यात हा चित्ररथ फिरविला जाणार आहे़
-अक्षय येवारे, जिल्हा व्यवस्थापक, गोदरेज अ‍ॅग्रीवेट कंपनी

Web Title: Parbhani: Farmers' awareness is' lost 'in agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.