परभणी : पेरणीपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:14 AM2019-05-10T00:14:49+5:302019-05-10T00:15:19+5:30
सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून, खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करून शेती पेरणीसाठी तयार करीत आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून, खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करून शेती पेरणीसाठी तयार करीत आहेत़
यावर्षी सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना रबी व खरीप हंगामात पावसाने साथ दिली नाही़ परिणामी रबी व खरीप हंगामातील पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही़ तालतुक्यातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीला सामोरे जात आहे़ परंतु, यावर्षीच्या दुष्काळाचे दु:ख विसरून आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी सरसावला आहे़ पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ गुढी पाडव्यापासून शेतकºयांच्या नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात करणाºया बळीराजासमोर यावर्षी आर्थिक संकटे अभे असले तरी शेतीची मशागत पुन्हा त्याच जोमाने सुरू केली आहे. मात्र पेरणीची तडजोड कशी करावी, याची चिंता शेतकºयांना सतावत आहे़
तालुक्यातील बहुतांश शेतकºयांजवळ बैलजोडी नाही़ त्यामुळे ट्रक्टरच्या सहाय्याने शेतातील वाळलेली पराटी काढण्याचे काम सुरू असून, शेतीची नांगरणी ट्रॅक्टरद्वारेच उरकून घेत असल्याचे दिसून येत आहे. शेतातील काशा वेचणीची कामे सकाळच्या वेळी उरकण्याचा सपाटा सुरू आहे. पावसाळ्याला एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे़ शेतकरी मशागतीची कामे आटोपण्यात व्यस्त आहेत. कृषी केंद्र चालक नवीन हंगामासाठी तयारी करीत असून, शेतकरी कोणते नवीन वाण येणार? याकडे लक्ष केंद्रीत करीत आहेत. लग्नसराईचा हंगाम असल्याने अनेक मजूरसुद्धा लग्नामध्ये व्यस्त आहेत़ त्यामुळे शेतातील कामे उरकण्यासाठी मजुरांचा शोध सुरू आहे़
बियाणे व औषधी पुरवठा करावा
४१९७२ पेक्षाही भयावह परिस्थिती सोनपेठ तालुक्यात दिसून येत आहे़ त्यामुळे गतवर्षी उसनवारी व बँकेच्या दारात उभे राहून पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकºयांनी पैसा उभा केला़ या पैशातून खरीप व रबी हंगामातील बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली़
४नैसर्गिक संकटांचा सामना करणारे हे शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत़ त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना मदत म्हणून खरीप हंगामासाठी बियाणे व औषधींचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे़