परभणी : उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:44 PM2018-10-11T23:44:30+5:302018-10-11T23:45:05+5:30

सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरासरी १४ हजार रुपयांचा खर्च झाला असून, त्या तुलनेत प्रति एकरी १८ हजार रुपयांचे उत्पादन होत असल्याने शेतकºयांना केवळ ४ ते ५ हजार रुपये हातात पडत आहेत. पेरणीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे़

Parbhani: Farmers in economic activities due to drop in production | परभणी : उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात

परभणी : उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात

googlenewsNext

सत्यशील धबडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरासरी १४ हजार रुपयांचा खर्च झाला असून, त्या तुलनेत प्रति एकरी १८ हजार रुपयांचे उत्पादन होत असल्याने शेतकºयांना केवळ ४ ते ५ हजार रुपये हातात पडत आहेत. पेरणीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे़
मानवत तालुक्यातील शेतशिवारात सध्या सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे़ दसरा सणाच्या आगोदर सोयाबीनची काढणी करून त्याच शेतात रबी हंगामातील पेरणीसाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे़ मात्र मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत असल्याने शेती करताना अडचणी निर्माण होत आहेत़ सोयाबीन काढणीसाठी एकरी १५ हजार रुपयाचा खर्च येत आहे़ दुसरीकडे शासनाकडून शेतकºयांना हमीभावाची शाश्वती दिली जात असली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर खरेदी करताना अनेक अटी निकषाचे ओझे शेतकºयांच्या खांद्यावर टाकले जात आहे़ आपला माल विक्री केल्यानंतरही चुकाºयासाठी तीन-तीन महिने शेतकºयांना ताटकळत रहावे लागत असल्याचा अनुभव शेतकºयांच्या पाठीशी आहे़ एकीकडे जाचक अटींची पूर्तता करून नाकी नऊ आलेल्या शेतकºयांना नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने खाजगी व्यापाºयांकडे मिळेल त्या भावात आपला माल विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे़ यामुळे शेतकºयांची अवस्था मागे आड पुढे विहीर अशी झाली आहे़ अनेक शेतकºयांनी
शासनाच्या जाचक अटींमध्ये अडकायला नको म्हणून खाजगी व्यापाºयांकडे आपला माल खाली केला आहे़ दहा वर्षांपासूनाचा शेती व्यवसाय आणि त्यापासून निघणाºया उत्पादनाची तुलना केल्यास शेती सर्वात तोट्याचा व्यवसाय ठरत आहे़ शेतीसाठी लागणारी अवजारे, निविष्ठा यांचा खर्च दुप्पटीने वाढत असून, शेतीमालाचा भाव घटला आहे़ तालुक्यातील सोयाबीन उत्पादनाचा विचार केल्यास शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़
एक हजार शेतकºयांची : आॅनलाईन नोंदणी
राज्य शासनाने सोयाबीनला हमीभाव ३ हजार ३९९ रुपये जाहीर केला आहे़ हमीभाव केंद्रावर माल विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सुरू केली, असून, नोंदणीचा एक हजाराचा आकडा पार झाला आहे़ मात्र प्रत्यक्षात या केंद्रावर खरेदी कधी सुरू होणार याची शाश्वती नसल्याने गरजेपोटी शेतकºयांना मिळेल त्या दराने खाजगी व्यापाºयांना सोयाबीन विक्री करण्याची वेळ आली आहे़
२००८ च्या तुलनेत सध्या सोयाबीन उत्पादनासाठी चौपट खर्च येत आहे़ उत्पन्न निम्म्यावर आले आहे़ शेतकºयांना आर्थिक फटका बसू नये म्हणून हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे़
दहा वर्षांतील सोयाबीनच्या भावातील फरक
वर्ष हमीभाव प्रत्यक्ष बाजार भाव
२००८-०९ १३९० १८०० ते २६००
२००९-१० १३१० २००० ते २७००
२०१०-११ १४४० २१०० ते २८००
२०११-१२ १६९० २४०० ते ५०००
२०१२-१३ २२४० २३०० ते २५००
२०१३-१४ २५६० २४५० ते ३७००
२०१४-१५ २५६० २४०० ते ३३००
२०१५-१६ २६०० १८०० ते २८०००
२०१६-१७ २७७५ १६०० ते २५००
२०१७-१८ ३०५० १६०० ते २५००
२०१८-१९ ३३९९ २७०० ते ३०००
एकरी सोयाबीन उत्पादनासाठी येणारा खर्च
शेती कामे वर्ष २००८ वर्ष २०१८
नांगरणी २५० रु़ १५०० रु़
रोटावेटर -- ३००
बियाणे ६०० २२००
पेरणी १०० १६००
बीज प्रक्रिया ़़़़ ६००
तननाशक १००० २५००
बुरशीनाशक ४०० १०००
फवारणी १०० ८००
कापणी ५०० २०००
काढणी ६० १२००
मजुरी १०० ७००
एकूण ३५६० १४४००

Web Title: Parbhani: Farmers in economic activities due to drop in production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.