परभणी : दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:49 PM2019-09-01T23:49:32+5:302019-09-01T23:49:55+5:30
राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसºया दिवशी रविवारी सुरूच होते. दरम्यान, दोन दिवसात एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसºया दिवशी रविवारी सुरूच होते. दरम्यान, दोन दिवसात एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही.
राज्यशासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे; परंतु, ज्या शेतकººयांकडे दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज आहे, अशा शेतकºयांचे पूर्ण कर्ज माफ होणे अपेक्षित असताना बँक प्रशासनाच्या वतीने विशिष्ट रक्कम भरण्यासाठी सांगितले जात असल्याचा आरोप आंदोलक शेतकºयांनी केला. या विरोधात शेतकºयांनी गावातील हनुमान मंदिरात शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. रविवारी दुसºया दिवशीही आंदोलन सुरु असून अधिकाºयांनी मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. तलाठी गोटे वगळता एकाही अधिकाºयांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही.
या आंदोलनात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर, आबासाहेब मसलकर, अन्सीराम कबले, विठ्ठल डुकरे, विठ्ठल मसलकर, लक्ष्मण गिरी, पिंटू पुरी, अनिल भारती, अशोक मसलकर, अर्जून कदम, सोमेश्वर भारती, आसाराम मसलकर, परमेश्वर कबले, गणेशराव मसलकर, गणेशराव कदम, मारोतराव कदम, भानुदास कदम, भागवत मसलकर, अनिल भारती आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.