परभणी : शेतकऱ्यांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:25 AM2018-03-24T00:25:11+5:302018-03-24T11:48:11+5:30

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत.

Parbhani: The farmers' tired of one crore 81 lakh rupees | परभणी : शेतकऱ्यांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले

परभणी : शेतकऱ्यांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले

Next

सत्यशील धबडगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत.
मानवत व पाथरी तालुक्यासाठी ९ फेब्रुवारीपासून मानवत येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये विदर्भ फेडरेशनच्या वतीने तूर खरेदीस सुरुवात करण्यात आली़ पाथरी व मानवत तालुक्यातील १ हजार ७०५ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ नोंदणी झालेल्या शेतकºयांना केंद्र चालक व खरेदी- विक्री संघाच्या वतीने संदेशही पाठवून खरेदी केंद्रावर तूर आणण्याचे आवाहन केले जात आहे़ विदर्भ फेडरेशनने ६ मार्चपर्यंत १९९ शेतकºयांची २ हजार ५३५ क्विंटल तूर खरेदी केली आहे. तर १ हजार ५०४ शेतकºयांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे. परंतु, खरेदी केंद्रावर तूर विक्री करुनही एकाही शेतकºयाला रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे १९९ शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख १५ हजार ७५० रुपये थकले आहेत. ८ दिवसांमध्ये शेतकºयांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करण्याचे आदेश शासनाने दिलेले असतानाही महिना उलटला तरीही एकाही शेतकºयाच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या लग्नसराई सुरु आहे. अनेक शेतकºयांनी तुरीच्या भरोस्यावर लग्न कार्य ठरविले आहे. परंतु, रक्कमच हाती आली नसल्याने शतकरी हतबल झाले असून तुरीच्या रक्कमेसाठी चकरा मारत आहेत.
एकच वजन काट्यामुळे संथ गतीने खरेदी
४बाजार समितीच्या परिसरामध्ये ९ फेब्रुवारीला तूर खरेदीस सुरुवात झाली आहे. खरेदी केंद्रावर हमालामार्फत चाळणी प्रक्रिया सुरु आहे. दररोज १५० ते १८० क्विंटल मोजमाप होत आहे. एकच वजनकाटा असल्याने मोजमाप कमी होत आहे. २७ फेब्रुवारीपासून दोन वजनकाटे वाढविले होते़ परंतु, नवीन चाळणी उपलब्ध नसल्याने पुन्हा हे काटे बंद करण्यात आले आहेत. हमीभाव केंद्रावर तूर खरेदी करण्याची १८ एप्रिल ही अंतिम तारीख आहे. खरेदी केंद्रावरील खरेदी बघता तूर विक्रीसाठी शेतकºयांना किमान दीड महिना वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्वच शेतकºयांची तूर विदर्भ फेडरेशनमार्फत खरेदी होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण होत आहे.
शेतकºयांचा ओढा हमी भाव केंद्राकडे
४सध्या बाजारपेठेमध्ये ४ हजार ३०० पासून ४ हजार ५०० रुपये पर्यंत प्रति क्विंटल दर आहेत. तर हमीभाव केंद्रावर ५ हजार ४५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी तूर खरेदी केंद्र जवळ करीत आहेत. तालुक्यातील शेतकरी तूर विक्रीसाठी अजूनही नोंदणी करीत आहेत. त्यामुळे शेतकºयांची संख्याही वाढत आहे.
सॉफ्टवेअरमध्ये अडचण असल्यामुळे तूर खरेदी केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास विलंब होत आहे.
-भागवत सोळंके, जिल्हा विपणन अधिकारी, विदर्भ मार्केटींग फेडरेशन

Web Title: Parbhani: The farmers' tired of one crore 81 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.