परभणी: हमीभाव केंद्रांमुळे शेतमालाला मिळेना भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:56 AM2018-10-20T00:56:32+5:302018-10-20T00:58:10+5:30
राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाकडे बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर काही शेतकºयांच्या हाती सोयाबीन पीक लागले आहे. त्याची काढणीही झाली आहे. सोयाबीनचा शेतमाल बाजारपेठेत येत आहे; परंतु, राज्य शासनाने हमीभाव खरेदी केंद्र अद्यापही सुरु केलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकराही बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव मिळणे आवश्यक असताना व्यापारी मात्र कवडीमोल दराने शेतकºयांचा माल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पिकांवर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्याने ज्या शेतकºयांना एकरी १० ते १२ क्विंटल सोयाबीनचा उतारा यायचा त्या शेतकºयांना आता एकरी १ ते २ क्विंटल सोयाबीनवरच समाधान मानावे लागत आहे.
त्यामुळे सध्या शेतकºयांची पुढे आड मागे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.
प्रति क्विंटल २ हजारांचा बसला फटका
४यावर्षीच्या खरीप हंगामातील मुगाला केंद्र शासनाने ६ हजार ९७५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. त्यामुळे ज्या शेतकºयांनी मुगाचे उत्पन्न घेतले. त्या शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु, नाफेडने जिल्ह्यात कोठेही हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे ज्या शेतकºयांना पैशाची निकड होती, त्या शेतकºयांनी बाजार समितीतील व्यापाºयांना आपल्या शेतमालाची विक्री केली. व्यापाºयांनीही शेतकºयांच्या अडचणींचा फायदा घेत ४००० ते ४५०० रुपयांनीच मुगाची खरेदी केली. त्यामुळे शेतकºयांना प्रति क्विंटल २ हजार रुपयांचा फटका बसला आहे.