परभणी: २३ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:46 PM2019-06-23T23:46:16+5:302019-06-23T23:46:46+5:30
येथील नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी १४, मानवत येथील नगराध्यक्षपदासाठी ३ आणि सोनपेठ येथील नगरसेवकाच्या एका जागेसाठी ६ अशा निवडणूक रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. तीनही ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले असून, सोमवारी निकाल हाती येणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी १४, मानवत येथील नगराध्यक्षपदासाठी ३ आणि सोनपेठ येथील नगरसेवकाच्या एका जागेसाठी ६ अशा निवडणूक रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. तीनही ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले असून, सोमवारी निकाल हाती येणार आहे़
परभणी महानगरपालिकेतील नगरसेवक पदाच्या दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली़ प्रभाग ३ ड या जागेसाठी एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ तर प्रभाग क्रमांक ११ अ या जागेसाठी ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ २३ जून रोजी सकाळी ७़३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला़ प्रभाग क्रमांक ३ मध्ये १८ मतदान केंद्रावर तर प्रभाग क्रमांक ११ मध्ये एकूण १५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले़ दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली़
प्रभाग क्रमांक ३ मध्ये एकूण १३ हजार ५८८ मतदारांपैकी ६ हजार ९९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे़ त्यात ३ हजार १३० महिला तर ३ हजार ८६६ पुरुष मतदारांनी मतदान केले़ ५१़४९ टक्के मतदान झाले आहे़ प्रभाग क्रमांक ११ अ या जागेसाठी २१ हजार ३३५ मतदारांपैकी ५ हजार ५५० मतदारांनी (४८.९६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला़ त्यात २ हजार ४४२ महिला मतदारांनी तर ३ हजार १०८ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे़ मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, आयुक्त रमेश पवार, उपायुक्त गणपत जाधव, भगवान यादव, सहाय्यक लेखाधिकारी राठोड, नगरसचिव विकास रत्नपारखे, बाळासाहेब मोरे, मंजूर हसन, करुणा स्वामी, परमेश्वर पारधे, साहेबराव पवार आदींनी प्रयत्न केले़
परभणी येथील कल्याण मंडपम्मध्ये सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून, साधारणत: एक ते दीड तासांत निकाल हाती येईल, अशी अपेक्षा आहे.
सोनपेठमध्ये ७४़९७ टक्के मतदान
च्सोनपेठ- येथील नगरपालिकेच्या सदस्याच्या एका जागेसाठी २३ जून रोजी झालेल्या पोट निवडणुकीत ७४़९७ टक्के मतदान झाले़ सोमेश्वर मंदिर दहीखेड प्रभाग १ ब च्या रिक्त जागेसाठी रविवारी दोन केंद्रांवर मतदान घेण्यात आले़ १ हजार ५४२ मतदारांपैकी १ हजार १५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़
च्त्यात ५८१ पुरुष तर ५७५ महिला मतदारांनी मतदान केले़ या पोट निवडणुकीत निर्मला सोमनाथ चव्हाण, आश्रोबा रामराव चिकणे, भगवान बापूराव किरवले, लक्ष्मण पंडित खरात, राजकन्या सुनील रंजवे, सुशील बालासाहेब सोनवणे या सहा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे़ सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे़
नगराध्यक्षपदासाठी ५८़८५ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : येथील नगराध्यक्ष पदासाठी २३ जून रोजी २१ केंद्रांवर मतदान पार पडले़ सायंकाळी ५़३० वाजेपर्यंत ५८़८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती सहाय्यक निवडूक निर्णय अधिकारी उमेश ढाकणे यांनी दिली़ २४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे़
नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीसाठी रविवारी सकाळी ७़३० ते सायंकाळी ५़३० या वेळेत मतदान पार पडले़ एकूण २६ हजार १५७ मतदारांपैकी १५ हजार ३९५ मतदारांनी मतदान केले़ त्यात ७ हजार ९६ महिला मतदार तर ८ हजार २९९ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ सकाळी ९़३० वाजेपर्यंत ९़७६ टक्के मतदान झाले होते़ त्यानंतर मात्र हळूहळू मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली़ एकूण ५८़८५ टक्के मतदान झाले आहे़
भाजपाचे उमेदवार प्रा़ एस़एऩ पाटील, काँग्रेसच्या उमेदवार पूजा खरात, अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे़
२४ जून रोजी सकाळी ११ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे़ दुपारी १ वाजेपर्यंत निकाल हाती येईल, अशी अपेक्षा आह़े़ मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश ढाकणे यांनी प्रयत्न केले़ पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़