परभणी : शेतीतील एकरभर केळी आगीत जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:59 PM2019-04-26T23:59:14+5:302019-04-26T23:59:41+5:30
तालुक्यातील अंधापुरी येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेला आग लागून जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): तालुक्यातील अंधापुरी येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेला आग लागून जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
अंधापुरी येथील शेतकरी गणेश शेषराव कोल्हे यांनी त्यांच्या गट क्रमांक २०८ मधील शेतीत २ एकर जमिनीवर जूनमध्ये केळीची लागवड केली होती. सध्या या केळीची तोडणी सुरु होती. ३० टक्के तोडणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास केळी घेऊन जाण्यासाठी एका व्यापाºयाचा ट्रक येथे आला. यावेळी केळीच्या बागेला अचानक आग लागली. या आगीत एक एकरवरील केळी व ठिबक सिंचनचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली.