परभणी : पंधरा कॉपीबहाद्दर आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:31 PM2020-02-26T23:31:45+5:302020-02-26T23:32:27+5:30
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बुधवारी जिल्ह्यात १५ कॉपीबहाद्दारांवर शिक्षण विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बुधवारी जिल्ह्यात १५ कॉपीबहाद्दारांवर शिक्षण विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.
जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. २६ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र, वाणिज्य संघटन आणि इतिहास या विषयाची परीक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात एकूण ५७ केंद्रावर रसायनशास्त्र आणि वाणिज्य संघटन विषयासाठी परीक्षा घेण्यात आली. ११ हजार ९४९ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ६७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या दोन्ही विषयाच्या परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या १४ परीक्षार्थ्यांवर पथकांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये लोहगाव येथील नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर २, पूर्णा शहरातील संस्कृती कनिष्ठ विद्यालयाच्या केंद्रावर १, बामणी येथील ब्रह्मेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ८ आणि वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते आश्रम शाळेच्या केंद्रावर तीन विद्यार्थ्यांना कॉपी करतान पकडण्यात आले.
दुपारच्या सत्रामध्ये ५७ केंद्रावर इतिहास विषयाची परीक्षा घेण्यात आली. ७ हजार ९०३ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ५११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेदरम्यान चारठणा येथील संत जनार्दन कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर कॉपी करणाºया एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली.
दहावी परीक्षेच्या बैठक व्यवस्थेत बदल
४दहावी परीक्षेचे केंद्र असलेल्या गांधी विद्यालय नवा मोंढा या शाळेत परीक्षार्थ्यांची बैठक क्षमता कमी असल्याने विभागीय आयुक्तांच्या परवानगीने या शाळेच्या केंद्रावरील परीक्षा क्रमांक के.१५४७७९ ते के.१५४८८० व के.१५४९०१ या १०३ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था उद्देश्वर विद्यालय गांधी पार्क या शाळेत केली आहे, अशी माहिती केंद्र संचालकांनी दिली.