परभणी : नवीन मतदान यंत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:20 AM2019-02-18T00:20:57+5:302019-02-18T00:21:31+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर येथून मतदान यंत्र रविवारी परभणीत दाखल झाले असून, हे मतदान यंत्र कल्याण मंडपम् येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत़

Parbhani: File new polling equipment | परभणी : नवीन मतदान यंत्र दाखल

परभणी : नवीन मतदान यंत्र दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर येथून मतदान यंत्र रविवारी परभणीत दाखल झाले असून, हे मतदान यंत्र कल्याण मंडपम् येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत़
जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे़ त्या दृष्टीने सुरुवातीला मतदार याद्यांचे पुनर्रिक्षण करण्यात आले़ हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ३१ जानेवारी रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अंतीम मतदार यादीही जाहीर करण्यात आली़ मार्च महिन्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे मतदान केंद्र, मतदान यंत्र, निवडणुकीसाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी आदी बाबींची पूर्तता केली जात आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये १५०४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, मतदान केंद्रांची सुसज्जताही यापूर्वीच करण्यात आली आहे़ दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यासाठी मतदान यंत्रांचा कोटा मंजूर केला आहे़ त्यात परभणी जिल्ह्यासाठीही मतदान यंत्र प्राप्त झाले आहेत़ १७ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथून हे मतदान यंत्र परभणी जिल्ह्यात दाखल झाले़ त्यामध्ये ५१० बॅलेट युनिट, ३२० कंट्रोल युनिट आणि ४२० व्हीव्हीपॅट यंत्रांचा समावेश आहे़ रविवारी हे मतदान यंत्र परभणीत दाखल झाल्यानंतर निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी सर्व पक्षप्रतिनिधींना पत्र पाठवून मतदान यंत्र स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते़ येथील कल्याण मंडपम् परिसरात केलेल्या स्ट्राँग रुममध्ये समन्वय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आणि शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे यंत्र स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले़
राखीव कोटाही झाला उपलब्ध
जिल्ह्यात १ हजार ५०४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यासाठी लागणारे मतदान यंत्र यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत़ राखीव कोटा म्हणून आणखी मतदान यंत्र जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत़ जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वी २ हजार ९८६ बॅलेट युनिट, १ हजार ७३६ कंट्रोल युनिट आणि १ हजार ७३६ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत़ नव्याने आणखी मतदान यंत्र दाखल झाल्यामुळे निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचा पुरेसा कोटा प्राप्त झाला आहे़ यापूर्वीचे मतदान यंत्र भारत इलेक्ट्रीकल्स लि़ या कंपनीचे होते तर कोल्हापूर येथून आलेले मतदान यंत्र इलेक्शन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि़ (ईसीआय) या कंपनीचे असल्याची माहिती मिळाली़
२८ फेब्रुवारी रोजी एफएलसी
जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची प्रथमस्तरावरील तपासणी (एफएलसी) २८ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे़ या तपासणीमध्ये प्रत्येक मतदान यंत्राची स्वतंत्र सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तपासणी केली जाते़ त्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागतो़ ही तपासणी करण्यासाठी पथकाची स्थापना केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी दिली़

Web Title: Parbhani: File new polling equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.