परभणी : तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:12 AM2020-02-20T00:12:12+5:302020-02-20T00:13:08+5:30
गोदावरी पात्रातील तारुगव्हाण येथील उच्च पातळीतील बंधाºयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंधाºयाला १७ गेट बसविण्यात आले आहेत. उर्वरित काम सुरु असून मार्च अखेरपर्यंत या बंधाºयात पाणी अडविण्याची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती बंधारा प्रशासनाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): गोदावरी पात्रातील तारुगव्हाण येथील उच्च पातळीतील बंधाºयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंधाºयाला १७ गेट बसविण्यात आले आहेत. उर्वरित काम सुरु असून मार्च अखेरपर्यंत या बंधाºयात पाणी अडविण्याची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती बंधारा प्रशासनाने दिली.
राज्य शासनाने पैठण ते बाभळीपर्यंत उच्च पातळीचे साखळी पद्धतीने बंधारे बांधण्याची मोहीम २००५ मध्ये हाती घेतली होती. याच प्रकल्पांतर्गत पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुद्गल या ठिकाणी दोन बंधारे मंजूर करण्यात आले होते. मात्र दोन्ही बंधाºयाच्या आतमध्ये गोदावरीच्या पात्रात जास्तीचे अंतर असल्याने काही गावे पाण्याच्या लाभापासून वंचित राहू लागली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता शासनाने तारुगव्हाण येथे बंधारा बांधण्यास मंजुरी दिली; परंतु, कंत्राटदाराच्या व पाटबंधारे विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे या बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे मागील १३ वर्षात या बंधाºयाचे काम संथगतीने करण्यात आले. त्यामुळे या बंधाºयातील पाण्याचा लाभ मिळेल की नाही, अशी शंका शेतकºयांमध्ये होती. त्यातच मागील वर्षापासून या बंधाºयाच्या कामाने गती घेतली होती. त्यामुळे बंधाºयाचे काम पूर्ण होऊन आॅक्टोबर २०१९ अखेर पावसाचे पाणी बंधाºयात अडविले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाळ्याच्या काळामध्ये बंधाºयाचे काम पूर्ण झाले नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये बंधाºयाच्या कामाला सुरुवात झाली. मागील महिनाभरापूर्वी बंधाºयाला १७ गेट बसविण्यात आले आहेत. गेटची चाचणी व इतर कामे सुरु आहेत. मार्च अखेर बंधाºयाचे सर्व काम पूर्ण होऊन या बंधाºयात पाणी साठवण्याची चाचणी केली जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता एस.एस. हाके यांनी दिली.
२१०० हेक्टर क्षेत्रावर सिंचन अपेक्षित
मुद्गल आणि ढालेगाव बंधाºयात यापूर्वीच पाणी अडविले गेले आहे. तारुगव्हाण बंधाºयाचे काम १३ वर्षापासून रखडले होते. या बंधाºयाची पाणी साठवण क्षमता ही १५.४६ दलघमी एवढी आहे. त्यामुळे मुद्गल आणि ढालेगाव या दोन बंधाºयापेक्षा तारुगव्हाण बंधाºयातील पाणी साठवण क्षमता अधिक आहे. या बंधाºयाच्या कार्यक्षेत्रात पाथरी आणि माजलगाव कार्यक्षेत्रातील १६ गावे येतात. त्यामुळे २१०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.