परभणी : अखेर तलाठ्यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:43 AM2019-01-10T00:43:05+5:302019-01-10T00:43:35+5:30
जिल्ह्यातील २ तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेप्रमाणे स्थगित केले असल्याची माहिती परभणी जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काजे यांनी दिली़ तसे पत्र जिल्हाधिकाºयांना बुधवारी देण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील २ तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेप्रमाणे स्थगित केले असल्याची माहिती परभणी जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काजे यांनी दिली़ तसे पत्र जिल्हाधिकाºयांना बुधवारी देण्यात आले़
जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी परभणी येथील मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांना तर परभणीतील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मांडवा येथील तलाठी शेख आयशा हुमेरा यांना उपविभागीय अधिकाºयांनी प्रशासकीय कामात अनियमितता केल्या प्रकरणी निलंबित केले होते़ जिल्हाधिकाºयांनी केलेली ही कार्यवाही अन्यायकारक असल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी ७ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते़ तत्पूर्वी ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी तलाठी संघटनेला दिलेल्या पत्रात प्रशासनाची निलंबनाची कार्यवाही योग्यच असल्याचे सांगून कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा कायद्यांंतर्गत तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असा इशारा दिला होता़ या इशाºयास दाद न देता तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस कामबंद आंदोलन केले़ तत्पूर्वी मंगळवारी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याशी व नंतर अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाºयांनी चर्चा केली़ या संदर्भात माहिती देताना काजे म्हणाले की, विभागीय आयुक्तांनी या मुद्यांवर चर्चा केल्यानंतर दुष्काळ, निवडणूक आहे, असे सांगून मागण्या मान्य केल्या़ निलंबन रद्द करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या व इतर मागण्या मंजूर करून क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी वर्गास बायोमॅट्रिक प्रणालीबाबत सक्ती असणार नाही, असे मान्य केल्याने परभणी जिल्हा तलाठी संघाच्या वतीने केलेले आंदोलन स्थगित केले असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनास दिले असल्याचे काजे म्हणाले़ तलाठ्यांच्या मागण्यांचे तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण आंबेकर यांनी विभागीय आयुक्तांकडे समर्थन केले व क्षेत्रीय कर्मचारी- अधिकाºयांना बायोमॅट्रिक लागू होत नाही व ते शक्य नाही, असे सांगितले असल्याचे काजे म्हणाले़ मंगळवारी दुपारी औरंगाबादेत बैठक झाल्यानंतर व पाचही मागण्या मान्य केल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी प्रशासकीय कामांना सुरुवात केली, असे काजे यांनी सांगितले.