परभणी : बस आगाराजवळील कुपाट्यांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:35 PM2020-04-13T23:35:11+5:302020-04-13T23:35:42+5:30
येथील एसटी महामंडळाच्या परभणी आगाराच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या वाळलेल्या कुपाट्यांना आग लागल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील एसटी महामंडळाच्या परभणीआगाराच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या वाळलेल्या कुपाट्यांना आग लागल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला़
येथील बसस्थानकाच्या परिसरात एसटी महामंडळाच्या आगारालगत मोठ्या प्रमाणात वाळलेली झाडे आहेत़ सोमवारी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास या झाडांना अचानक लाग लागली़ पाहता पाहता ही आग वाढू लागली़ सध्या संचारबंदीमुळे आगारातील सर्व बसेस याच भागात उभ्या करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे बसगाड्यांनाही आगीच्या झळा पोहचण्याचा धोका निर्माण झाल्याने एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी ही माहिती अग्नीशमन दलाला दिली़ काही वेळातच अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला़ प्रभारी अग्नीशमन अधिकारी बी़डी़ कानवडे, मदन जाधव, गणेश गायकवाड, चालक एसक़े़ मौलाना आदीच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले़