परभणी : ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:28 AM2018-10-23T00:28:23+5:302018-10-23T00:29:29+5:30

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या तयारी अंतर्गत सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीला सुरुवात झाली आहे़

Parbhani: First level check of EVM machine started | परभणी : ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू

परभणी : ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या तयारी अंतर्गत सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीला सुरुवात झाली आहे़
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०१९ मध्ये होणार आहेत़ त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक विभागाकडून प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे़ या अंतर्गत राजकीय पक्षांच्या उपस्थितीत सोमवारी ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू करण्यात आली़ शहरातील जायकवाडी वसाहत भागातील कल्याण मंडमप् येथे जिल्ह्यासाठी प्राप्त २९८६ बीयू, १७३६ सी़यू़ व १७३६ व्हीव्ही पॅट मशीनची तपासणी केली जाणार आहे़
सोमवारी पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या तपासणीच्या वेळी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे, गंगाखेडचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, काँग्रेसचे प्रतिनिधी सुहास पंडित, बसपाचे मराठवाडा प्रभारी विश्वनाथ मोडे, राजाभाऊ येटेवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी आदींसह नायब तहसीलदार नंदकुमार भातांब्रेकर, अव्वल कारकून पी़पी़ वानखेडे, शिराळे, प्रवीण कोकडे आदींची उपस्थिती होती़ निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमही सुरू असून, या अंतर्गत नवीन मतदारांची नोंदणी व नावात बदल, नाव वगळे आदी कामे सुरू आहेत़

Web Title: Parbhani: First level check of EVM machine started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.