परभणी : येलदरी धरणातील मत्स्य व्यवसाय धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:54 PM2019-08-25T23:54:52+5:302019-08-25T23:55:25+5:30
गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी वरदान ठरलेल्या येलदरी धरणात सहा वर्षांपासून पाणीसाठा होत नसल्याने येथील मत्स्य व्यवसायासाठी धोक्यात आला आहे़ यावर्षी या धरणात शून्य टक्के पाणीसाठा असल्याने मत्स्य व्यवसायात असलेल्या सुमारे दीड हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी) : गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी वरदान ठरलेल्या येलदरी धरणात सहा वर्षांपासून पाणीसाठा होत नसल्याने येथील मत्स्य व्यवसायासाठी धोक्यात आला आहे़ यावर्षी या धरणात शून्य टक्के पाणीसाठा असल्याने मत्स्य व्यवसायात असलेल्या सुमारे दीड हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे़
येलदरी धरणात ५० वर्षांपासून मत्स्य व्यवसाय केला जातो़ या व्यवसायातून दीड हजारांहून अधिक कुटुंबियांचा चरितार्थ चालतो़ या धरणातील गोड्या पाण्यातील माशाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे़ या धरणातील प्रॉन्स जातीच्या माशाला मोठी मागणी आहे. गोड्या पाण्यातील माशाबरोबरच झिंग्यामुळे देखील येलदरी धरणाची ओळख निर्माण झाली आहे़ मात्र मागील पाच - सहा वर्षांपासून निसर्गाची अवकृपा होत असल्याने येथील मत्स्य व्यवसाय अडचणीत आला आहे़
धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नसल्याने मुबलक पाणीसाठा होत नाही़ गतवर्षीपासून या धरणाची स्थिती अधिकच खालावली आहे. पुरेशे पाणी नसल्याने मत्स्य बीज सोडताना अडचणी येत आहेत़ त्यामुळे अपेक्षित मासेही उपलब्ध होत नाहीत़ धरणातील कमी होणारे पाणी अनेक व्यवसायांना अनेक चिंता निर्माण करणाऱ्या आहेत़ दरवर्षी पाणीसाठा कमी होत असल्याने मत्स्य बाजारपेठेत देखील शुकशुकाट दिसून येत आहे़ आगामी काळात चांगला पाऊस नाही पडल्यास येलदरी धरणावर मत्स्य व इतर व्यवसाय करून पोट भरणाºया हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागण्याची वेळ येऊ शकते़ तेव्हा यावर पर्याय उपलब्ध करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़
नदीजोड प्रकल्पात विचार व्हावा
४येलदरी धरण हे मराठवाड्यासाठी वरदान ठरले आहे़ या धरणाने मत्स्य व्यवसाय, पिण्याचे पाणी व शेती सिंचनाचा प्रश्न मिटविला आहे़ त्यामुळे हे धरण शेतकऱ्यांसाठीही लाभदायक आहे; परंतु, दरवर्षी या भागात अवर्षण परिस्थिती निर्माण होत आहे़
४त्यातच मत्स्य व्यवसाय करून उपजीविका भागविणाºया दीड हजार कुटुंबियांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे़ मागील सहा वर्षांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मत्स्य व्यसायिक अडचणीत आहे. तेव्हा त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्प योजनेत येलदरी धरणाचाही समावेश करावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे़