परभणी : पाच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:36 AM2018-08-01T00:36:22+5:302018-08-01T00:37:11+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

Parbhani: Five lakh farmers filled crop insurance | परभणी : पाच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

परभणी : पाच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक शेतकरीपीक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील शेतकºयांची भिस्त ही खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते; परंतु, गेल्या चार वर्षापासून सुलतानी व अस्मानी संकटामुळे शेतकºयांनी खरीप हंगामात पेरणी व लागवड केलेल्या पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नाही.
शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत पिकांच्या नुकसानीपोटी शेतकºयांना नुकसान भरपाई दिली जाते.
२०१६ मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ४२९ कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली होती. त्यामुळे नैसर्गिक संकटाने शेतकºयांची पिके हिरावून नेली असली तरी विमा कंपनीने केलेल्या मदतीमुळे अनेक शेतकºयांना आर्थिक पाठबळ मिळाले; परंतु, २०१७ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होऊनही मदत नाकारली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर राज्य शासनाने याची दखल घेऊन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून जिल्ह्याचे काम काढून २०१८ वर्षासाठी या खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आला. त्यासाठी १ ते ३१ जुलै अशी मुदत देण्यात आली. अखेरच्या दिवशी मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. दरम्यान, जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन या तांत्रिक कारणामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत आपले प्रस्ताव दाखल करु शकले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने किमान ८ आॅगस्टपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांमधून होत आहे.
सीएससी केंद्रांचा पुढाकार
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यावर्षीपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन विमा कंपनीने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. सीएससी केंद्रांनी ४ लाख ६८ हजार ५४७ शेतकºयांचा २१ कोटी २२ लाख ४४ हजार ८५५ रुपयांचा पीक विमा भरुन घेतला आहे. त्या पाठोपाठ जिल्ह्यातील बँकांनी ४४ हजार ४९५ शेतकºयांचा २ कोटी ९४ लाख ४८ हजार ४४३ रुपयांचा पीक विमा भरुन घेतला आहे. तर १२ हजार ४४२ शेतकºयांनी डिजीटल यंत्रणेचा वापर करुन ६५ लाख ८४ हजार ७३१ रुपयांचा विमा भरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीएसीसी केंद्रांनी पीक विमा प्रस्ताव स्वीकारण्यास पुढाकार घेतल्याचे वरील आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
मंगळवारी शेतकºयांनी केली गर्दी
जिल्ह्यातील पीक विम्याचे काम पाहणाºया इफ्को टोकियो या कंपनीने ३१ जुलै ही विमा प्रस्ताव सादर करण्यास मुदत दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कापूस पिकावर विविध अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी अनेक शेतकºयांनी अळ्यांची धास्ती घेऊन कापूस पिकाचा पीक विमा उतरविण्यासाठी सीएसी केंद्र, बँक व डिजीटल यंत्रणेकडे गर्दी केल्याचे दिसून आले.

Web Title: Parbhani: Five lakh farmers filled crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.