परभणी : ११ हजारांचा दर नळ जोडणीसाठी निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:41 AM2020-01-28T00:41:21+5:302020-01-28T00:41:42+5:30

नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना आता अकरा हजार रुपयांमध्ये नळजोडणी देण्याचा ठराव सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरात लवकरच नव्या नळजोडणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Parbhani: Fixed for tap connection of 1 thousand | परभणी : ११ हजारांचा दर नळ जोडणीसाठी निश्चित

परभणी : ११ हजारांचा दर नळ जोडणीसाठी निश्चित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना आता अकरा हजार रुपयांमध्ये नळजोडणी देण्याचा ठराव सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरात लवकरच नव्या नळजोडणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्राच्या युआयडीएसएसएमटी आणि राज्याच्या अमृत योजनेतून परभणी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून, या योजनेअंतर्गत नळ जोडणीसाठी मनपा प्रशासनाने ठरविलेले दर अवास्तव असल्याने या दरांना या मागील २ सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली नव्हती. हे दर निश्चित करुन नळजोडणी करण्यासाठी मनमाने २७ जानेवारी रोजी तातडीची विशेष सभा बोलावली होती. येथील बी.रघुनाथ सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता सभेला प्रारंभ झाला. महापौर अनिता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त रमेश पवार, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेच्या सुरुवातीलाच उपमहापौर भगवान वाघमारे यांनी ठराव मांडला. नवीन पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. चाचण्याही गतीने पूर्ण केल्या जात आहेत. सध्या या योजनेचे पाणी शहरातील जलकुंभामध्ये आहे. जलकुंभामध्ये जास्त काळ पाणी साठवून ठेवणे योग्य नसल्याने नळ जोडणीचे दर निश्चित करण्याचा निर्णय त्वरीत घेणे गरजेचे आहे. इतर महानगरपालिकांमध्ये केलेली चर्चा आणि महाराष्टÑ शासनाच्या मान्यताप्राप्त असलेल्या महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने नळ जोडणीचे दरपत्रक महापालिकेला दिले आहे. त्यानुसार आयुक्त रमेश पवार यांनी हे दर निश्चित केले होते. त्यात सुरुवातीला पाईप, मीटर, खोदकाम आणि काँक्रीटीकरण करुन देण्यासाठी एजन्सीने १० हजार रुपये घेणे आणि महानगरपालिकेची अनामत रक्कम ४ हजार रुपये असा १४ हजार रुपयांचा दर निश्चित केला होता. नगरसेवकांनी त्यास विरोध केल्याने अनामत रक्कम २ हजार रुपये करण्यात आली. तसेच एजन्सीचे १ हजार रुपये कमी केले आहेत. त्यामुळे एजन्सीचे ९ हजार आणि अनामत रक्कम २ हजार असे ११ हजार रुपये नळजोडणीचा दर निश्चित करण्यात आला. या ठराव सभागृहासमोर मांडल्यानंतर नगरसेविका जयश्री खोबे, सचिन अंबिलवादे, विकास लंगोटे यांनी काही शंका उपस्थित केल्या. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी या ठरावास मंजुरी दिली.
स्थळदर्शक नकाशा बंधनकारक करा
४एजन्सीकडून स्थळदर्शक नकाशा घेतल्यास एकूण नळजोडणी, एकाच जागी किती नळजोडणी दिल्या, प्रत्यक्ष कुठे जोडणी दिली, त्यासाठी पाईप किती वापरला याची माहिती मनपाला मिळणार आहे.
४शिवाय अवैध नळजोडणीचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे नळजोडणी देताना मनपा प्रशासनाने एजन्सीकडू स्थळदर्शक नकाशा घेणे बंधनकारक करावे, अशा सूचना उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केली.

Web Title: Parbhani: Fixed for tap connection of 1 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.