परभणी : दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:46 PM2019-09-01T23:46:52+5:302019-09-01T23:47:55+5:30

यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच शनिवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने ओढे आणि नाले खळखळून वाहिले असून, या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे़ परिणामी काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे़ रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़

Parbhani: Flooding drains with strong rain | परभणी : दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर

परभणी : दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच शनिवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने ओढे आणि नाले खळखळून वाहिले असून, या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे़ परिणामी काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे़ रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़
शनिवारी दिवसभर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती़ रात्री ११ वाजेच्या सुमारास परभणी शहर व परिसरात १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस झाला़ त्यानंतरही पावसाचा जोर कायम होता़ रविवारी पहाटेही सूर्यदर्शन झाले नाही़ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते़ परभणी शहरासह तालुक्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ पालम तालुक्यात दमदार पाऊस झाला असून, पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाथरी तालुक्यातही सरासरी ५१़३३ मिमी पाऊस झाला आहे़ मानवत, गंगाखेड, पूर्णा या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़
चारठाण्यात मुसळधार
चारठाणा व परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. मागील २०-२२ दिवसांपासून या परिसरात पावसाने दडी मारली होती. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला.
पाथरीत प्रथमच जोरदार
पाथरी तालुक्यात ३१ आॅगस्ट रोजी या पावसाळ्यातील पहिलाच जोरदार पाऊस झाला. रविवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे सोयाबिन, कापूस, तूर या पिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात सरासरी ५१.३३ मि.मी. पाऊस झाला आहे.
चार मंडळांत अतिवृष्टी
६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यास महसूल प्रशासन अतिवृष्टीची नोंद घेते़ शनिवारी रात्री जिल्ह्यातील ४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे़ त्यात पाथरी मंडळात सर्वाधिक ८० मिमी पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात ७५ मिमी, गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळात ७५ मिमी आणि जिंतूर तालुक्यात सावंगी म्हाळसा मंडळामध्ये ६८ मिमी पाऊस झाला़
झरी मंडळात दोन दिवसांत ११० मिमी पाऊस
झरी- परभणी तालुक्यातील झरी मंडळामध्ये शुक्रवार आणि शनिवारी या दोन दिवसांत ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ झरीपासून वाहणाऱ्या लेंडी नदीवरील बंधारे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले आहेत़ अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़ मागील ४८ तासांत या मंडळात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ झरी मंडळाची वार्षिक सरासरी ९२२ मिमी आहे़ तीन महिन्यांत या मंडळात ४७३़६ मिमी पाऊस झाला आहे़ झरीची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया लेंडी नदीला पाणी आल्याने या नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत़
पालमममध्ये : लेंडी नदीला पूर
४पालम तालुक्यात रात्री १२ वाजेपासून पावसाला प्रारंभ झाला़ पहाटे ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसत होता़ या पावसामुळे शहराजवळून वाहणाºया लेंडी नदीला पूर आल्याने १ सप्टेंंबर रोजी नदीपलीकडील १२ गावांमधील ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटला होता़
४दुपारी २ वाजेपर्यंत पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प होती़ दुपारी २ नंतर पुलावरून वाहतूक सुरू झाली़ पालम ते जांभूळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्धा किमी अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात कमी उंचीचा पूल आहे़ या पुलाच्या नळकांड्या चिखलाने भरून जातात़
४त्यामुळे पाणी पुलावरून वाहते़ रविवारी पहाटे ४ वाजेपासून पुलावरील वाहतूक बंद होती़ पुलावरून ५ फुट पाणी वाहत असल्याने फळा, आरखेड, घोडा, सोमेश्वर, उमरथडीसह इतर १२ गावांचा संपर्क तुटला होता़
मानवत तालुक्यातील ८२ मिमी पाऊस
मानवत तालुक्यात शनिवारी रात्री १०़३० ते १२़३० या दोन तासांत जोरदार पाऊस झाला़ कोल्हा, मानवत आणि केकरजवळा या तिन्ही मंडळांत मिळून ८२ मिमी पाऊस झाला आहे़ या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ प्रथमच ओढे-नाल्यांना पाणी आले.
दूधना वाहू लागली
४झरी- पावसाअभावी दोन वर्षांपासून दूधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे़ मागील वर्षी परभणी, पूर्णा या शहराला पिण्याचे पाणी देण्यासाठी निम्न दूधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने दूधना नदी वाहती झाली होती़ परंतु, त्यानंतर संपूर्ण पावसाळ्यातही नदीचे पात्र कोरडेठाक होते़ शनिवारी रात्री झालेल्या पावसाने झरी परिसरात दूधना नदीलाही पाणी आले आहे़ ही नदी वाहती झाली असून, आणखी पावसाची आवश्यकता आहे़
जिल्ह्यात सरासरी ४०़७० मिमी पाऊस
शनिवारी रात्री झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे़ रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये सरासरी ४०़७० मिमी पाऊस झाला़ त्यात सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यात ५७़५० मिमी, पाथरी तालुक्यात ५१़३३ मिमी, पूर्णा ४०़८० मिमी, पालम ३९ मिमी, जिंतूर ३५़१७ मिमी, सेल ३४ मिमी, मानवत २७़३३ आणि परभणी तालुक्यात २०़२० मिमी पावसाची नोंद झाली आहे़
यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत ३५३़३६ मिमी पाऊस झाला असून, पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ४६२ मिमी, मानवत ३८५, सोनपेठ ३७७, गंगाखेड ३७५, जिंतूर ३४१, पाथरी ३३४, परभणी ३०२, पालम ३०१ आणि सेलू तालुक्यात ३०० मिमी पाऊस झाला आहे़ वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ४५़६ टक्के पाऊस झाला आहे़
वडी ओढ्याला पाणी
४पाथरी- शनिवारी रात्री तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने ओढे-नाल्यांना पाणी आले आहे़ वडी शिवारातील नाला या पावसामुळे पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिला़

Web Title: Parbhani: Flooding drains with strong rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.