परभणी : गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:22 AM2018-01-01T00:22:52+5:302018-01-01T00:23:19+5:30

तालुक्यातील विटा येथील गोदावरी नदीपात्रात ३१ डिसेंबर रोजी सखाराम गेमा पवार या ७० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह आढळला़

Parbhani: found dead in Godavari river bed | परभणी : गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह

परभणी : गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : तालुक्यातील विटा येथील गोदावरी नदीपात्रात ३१ डिसेंबर रोजी सखाराम गेमा पवार या ७० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह आढळला़
उपलब्ध माहितीनुसार विटा खु़ येथील मदन विटेकर यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी कामगार आले आहेत़ मदन विटेकर यांची शेती नदीपात्राजवळ आहे़ ३१ डिसेंबर रोजी गोविंद वीर हे मजुरांना शेतातील ऊस दाखवित असताना नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह त्यांना आढळला़ ही माहिती मदन विटेकर यांना देण्यात आली़ विटेकर यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले़
विटा येथील होडी चालक तुकाराम परसे व राजेश परसे यांच्या मदतीने हा मृतदेह पात्रातून बाहेर काढण्यात आला़
प्रारंभी मृतदेहाची ओळख पटत नसल्याने सोनपेठ पोलसांनी पाथरी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली़ लिंबा येथील आनंदनगर तांडा येथील व्यक्ती घर सोडून गेल्याची तक्रार पाथरी पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे सोनपेठ पोलिसांना समजले़ त्यावरून आनंदनगर तांडा येथील अजित पवार यांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावले़ तेव्हा मयत हे त्याचे वडील सखाराम गेमा पवार हे असल्याचे त्यांनी सांगितले़
सखाराम पवार हे २० ते २५ दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते़ दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याची माहिती घेण्याचे काम पोलीस करीत आहेत़

Web Title: Parbhani: found dead in Godavari river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.