परभणी : शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीत साडेचार तास ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:19 AM2018-09-08T00:19:27+5:302018-09-08T00:19:57+5:30
जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.
शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ सप्टेंबरपासून सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथून पाथरी, मानवत, परभणी तालुक्यातून पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा शुक्रवारी परभणीत दुपारी १ वाजेच्या सुमारास दाखल झाली. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वारासमोर दाखल झाली. यावेळी समोरच्या पोर्चमध्येच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लावण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष माऊली कदम, अण्णा जोदगंड, विश्वांभर गोरवे, किरण चक्रपाणी, कॉ.विलास बाबर, अनंतराव कदम, अमृतराव शिंदे, बंडू सोळंके, माधवराव जोगदंड, ज्ञानोबा जोगदंड, किशनराव मुलगीर, भारत गोरवे, भूजबळ, शिवाजीराव बोबडे, नितीन जाधव, मंगेश तांदुळवाडीकर, स्वप्नील कटारे आदींची उपस्थिती होती. यावेळी गतवर्षी प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सर्व शेतकºयांना पीक विमा देण्यात यावा. तसेच मूग, उडीद पीक काढण्यात आले आहे. पोळा व महालक्ष्मीचा सण तोंडावर असताना बाजारपेठेत विक्रीची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे या संदर्भात संबंधितांना खरेदीचे आदेश देण्यात यावेत. शेतकºयांना बँका पीक कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. या संदर्भात कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेतली. जिल्हाधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर परभणी बाजार समितीत शेतकºयांचा उडीद व मूग खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काटे सुरु करण्यात येतील, आंदोलनकर्त्यांनी सोबत आणलेला ट्रॅक्टरमधील मूग बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काटा करुन आवकची नोंद घेतली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश बँकांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले. तसेच पीक विम्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. तब्बल साडेचारतास झालेल्या आंदोलनानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हे आंदोलन संपले.