परभणी : वाळू चोरी करताना चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:07 AM2020-01-13T00:07:54+5:302020-01-13T00:08:54+5:30

इसाद येथील मासोळी नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्यानंतर शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणाहून चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन जप्त केली.

Parbhani: Four tractors, one JCB machine were caught while stealing sand | परभणी : वाळू चोरी करताना चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन पकडली

परभणी : वाळू चोरी करताना चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन पकडली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): इसाद येथील मासोळी नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्यानंतर शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणाहून चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन जप्त केली.
गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या मासोळी नदीपात्रातील ठोकरवाळू आणण्यासाठी १२ जानेवारी रोजी दुपारी २ ते अडीच वाजेच्या सुमारास शहरातील काही ट्रॅक्टरचालक गेले होते. वाळू काढत असताना या भागातील शेतकरी भागवत साहेबराव सातपुते यांनी वाळू उपस्याची परवानगी विचारली. वाळू उपस्याने शेत जमीन घासून नुकसान होत असल्याचे सांगत उपसा करण्यास मज्जाव केला. त्यावरुन ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांत वाद झाला. हे प्रकरण हातघाईवर आले आणि ट्रॅक्टर चालकाने दगडाने शेतकºयाला मारहाण केली.
या मारहाणीत भागवत साहेबराव सातपुते तसेच ट्रॅक्टर चालकासोबत आलेले नगरसेवक नागनाथ कासले आणि गणेश केरबा सातपुते हे तिघे जखमी झाले आहेत.
या ठिकाणी होत असलेला गोंधळ पाहून आजूबाजूचे शेतकरी, इसाद येथील ग्रामस्थ नदीपात्र परिसरात जमा झाले. शेतकरी व ग्रामस्थांनी चार ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन अडवून ठेवत पोलीस, महसूल प्रशासनाला माहिती दिली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे, जमादार रतन सावंत, टी.टी. शिंदे, राजू ननावरे, सुग्रीव सावंत, आनंद डोंगरे, योगेश सूर्यवंशी, अव्वल कारकून दत्तराव बिलापटे, तलाठी अक्षय नेमाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन जप्त करुन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

Web Title: Parbhani: Four tractors, one JCB machine were caught while stealing sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.